Heavy Rain : नगर जिल्ह्यात दमदार पावसामुळे ६६ टँकर बंद

Rain Update : उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील २९३ गावे आणि १ हजार ५७८ वाड्यांना ३१६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जिल्ह्यात मॉन्सून दमदार झाल्याने अनेक गावांतील जलस्रोत सुरू झाले आहेत. एक आठवड्यात ६६ टँकर बंद झाले आहे.
Water Tanker
Water TankerAgrowon
Published on
Updated on

Nagar News : उन्हाळ्यामध्ये जिल्ह्यातील २९३ गावे आणि १ हजार ५७८ वाड्यांना ३१६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. जिल्ह्यात मॉन्सून दमदार झाल्याने अनेक गावांतील जलस्रोत सुरू झाले आहेत. एक आठवड्यात ६६ टँकर बंद झाले आहे. काही गावांतील विहिरींना सध्या गढळू पाणी असल्याने टँकर सुरू आहेत. विहिरीतील पाण्याचा दर्जा सुधारल्यावर आणखी बऱ्यात गावातील टँकर बंद होणार आहेत.

जिल्ह्यात मागील वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला होता. उन्हाळ्याच्या प्रारंभीच पाणीटंचाई निर्माण झाली. एप्रिल-मे महिन्यांतच जिल्ह्यात टंचाईचे स्वरूप तीव्र झाले आहे. पाथर्डी, संगमनेर, पारनेर, नगर, कर्जत-जामखेड तालुक्यांत प्रशासनाच्या वतीने टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.

Water Tanker
Water Tanker : चाळीसगावच्या ११ गावांमध्ये टँकर

जिल्ह्यातील २९३ गावांतील १ हजार ५७८ वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ५ लाख ८२ हजार ३९० जनता टँकरच्या पाण्यावर असल्याचे भीषण परिस्थिती होती. ३१६ टँकरने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. कर्जत तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील २५ टँकर बंद झाले आहेत. अजूनही काही भागांत मात्र पुरेसा पाऊस झाला नसल्याने टॅंकरने काही दिवस पाणीपुरवठा करावा लागणार आहे.

Water Tanker
Heavy Rain : परभणी जिल्ह्यातील ३ मंडलात अतिवृष्टी

शहरी भागातही टँकने पाणी

पाथर्डी नगरपालिकेतील एक उपनगर आणि २५ वस्त्यांमधील २ हजार ८२४ जनतेला ६ टँकरने पाणीपुरवठा केला जात होता. कर्जतमधील एक उपनगर ४ वस्त्यांमधील २७ हजार १०० जनतेसाठी ११ टँकर सुरू होते. या दोन्ही शहरांतील टँकर बंद करण्यात आले आहेत. पारनेरमधील एक उपनगर आणि ३२ वस्त्यांमधील ५ हजार जनतेची तहान टँकर अवलंबून आहे.

येथे ३ टँकरसुरू आहेत. श्रीगोंदेमधील एक उपनगर आणि १० वस्त्यांमधील ४ हजार ३३१ जनतेसाठी ४ टँकर सुरू आहेत. त्यापैकी २ टँकर बंद करण्यात आले. शेवगावमधील एक उपनगर आणि १४ वस्त्यांमधील २ हजार ३०० जनतेसाठी ३ टँकर सुरू होते. हे ३ टँकर बंद करण्यात आले आहेत.

सुरू असलेले टॅंकर

संगमनेर-३१, अकोले- ५, कोपरगाव ८, नेवासे- २, राहाता-२, नगर-३५, पारनेर-३५, पाथर्डी- ९३, शेवगाव-१४, कर्जत-१७, जामखेड-२६, श्रीगोंदे- ९ टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com