Krishi Seva Kendra : पाच कृषिसेवा केंद्रचालकांचे परवाने वर्षभरासाठी निलंबित

Agriculture service licenses suspended : प्रथमच पैठण तालुक्यात चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या पाच दुकानावर कार्यवाही करण्यात आल्याने चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.
Krushi Seva Kendra News
Krushi Seva Kendra NewsAgrowon
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News : बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा भासवून शेतकऱ्यांची आर्थिक लूट करण्यास सुरुवात केल्याची तक्रार प्राप्त होताच संनियंत्रण व भरारी पथकाने पैठण तालुक्यातील कृषी केंद्रांची तपासणी करून पाचोडसह विहामांडवा येथील प्रत्येकी दोन, तर पैठण येथील एक अशा एकूण पाच केंद्रांचे परवाने एक वर्षासाठी मंगळवारी (ता. १३) निलंबित केले.

Krushi Seva Kendra News
Krishi Seva Kendra : नागपूर जिल्ह्यातील २५ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित

पैठण तालुक्यात कृषिसेवा केंद्रचालक काही विशिष्ट कंपनीच्या कपाशीच्या बियाणांच्या पिशव्या ८५३ किंमत असताना १३०० ते २६०० रुपयांत विक्री करीत असल्याच्या तक्रारी जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी प्रकाश देशमुख व जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांना प्राप्त झाल्या होत्या.

त्यावरून त्यांनी तालुका संनियंत्रण कक्ष व भरारी पथकास कार्यवाहीच्या सूचना दिल्या. त्यानुसार पाचोड, विहामांडवा व पैठण येथील कृषी केंद्राची तपासणी केली असता त्यांनी चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या पाचोड येथील श्रीराम कृषी सेवा केंद्र व विशाल कृषी सेवा केंद्र तर विहामांडवा येथील अमृता एजन्सी व स्वामी ट्रेडर्स, तर पैठण शहरातील प्लांटेशन ॲग्रो सर्व्हिसेस यांचे परवाने एक वर्ष कालावधीसाठी निलंबित केले.

पाचोड येथे आलेल्या भरारी पथकात तालुका कृषी अधिकारी संदीप शिरसाठ, कृषी पर्यवेक्षक संदीप जवणे, कृषी सहायक प्रमोद रोकडे व कृषी सहाय्यक यशवंत चौधरी, तर विहामांडवा येथील कार्यवाहीत जिल्हा भरारी पथकाचे जिल्हा कृषी अधिकारी प्रशांत पवार, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक गणेश सर्कलवाड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रामकृष्ण पाटील यांनी सहभाग नोंदवला.

प्रथमच पैठण तालुक्यात चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या पाच दुकानावर कार्यवाही करण्यात आल्याने चढ्या दराने बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत. याशिवाय कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी येथील किसान ॲग्रो सेंटरचा परवाना सहा महिन्यांसाठी रेकॉर्ड नसल्याच्या कारणावरून निलंबित केला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com