

Nagpur News : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कृषिसेवा केंद्रातून बियाणे, खतांचे नमुने घेत प्रयोगशाळांमधून त्याच्या चाचणीवर भर दिला आहे.
त्या अंतर्गंत अप्रमाणित नमुने आढळलेल्या २५ कृषिसेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले असून २९ कृषिसेवा केंद्रांना विक्रीस प्रतिबंधाचे आदेश देण्यात आले आहेत.
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून बियाणे, खते व इतर निविष्ठा खरेदीची लगबग वाढली आहे. अशावेळी त्यांची फसवणूक होण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाकडून तपासणीवर भर देण्यात आला आहे.
जिल्हा परिषदेत नव्याने रुजू झालेले कृषी विकास अधिकारी संजय पिंगट, मोहीम अधिकारी जयंत कौटकर, जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक मार्कंड खंडाईत, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका, पंचायत समिती कृषी अधिकारी यांच्या भरारी पथकाने मोहीम राबविली.
तीन बियाणे उत्पादक आणि ४३४ कृषिसेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. या माध्यमातून १३४ बियाणे, १३७ रासायनिक खते, २५ कीटकनाशक नमुने घेत ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले.
यापैकी १३ रासायनिक खते, एक बियाणे आणि १ कीटकनाशक नमुना अप्रमाणित आढळून आला. गुणवत्ता नियंत्रण मानकाची पूर्तता न झाल्याने २५ कृषिसेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले. यासोबतच २९ कृषिसेवा केंद्रधारकांना विक्री बंद आदेश जारी करण्यात आले आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.