मनाचा निचरा करूया...

आ पण अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतो. परंतु संतुलित  मनासाठी त्या गोष्टींचा वेळेत निचरा होणंही खूप महत्त्वाचं आहे.
मनाचा निचरा करूया...
Published on
Updated on

आ पण अनेक गोष्टी मनात साठवून ठेवतो. परंतु संतुलित मनासाठी त्या गोष्टींचा वेळेत निचरा होणंही खूप महत्त्वाचं आहे. साचलेलं मन डबक्यासारखं असतं. अशी मने नकारात्मकता पसरवतात. मनाचा निचरा व्हायचा असेल तर मन मोकळं करायला हवं. कुणी मनमोकळं रडतं, डायरी लिहूनही मन हलकं होतं. कुणी एकांतवासात राहून तसेच आपल्या भावना समजून घेणाऱ्‍या व्यक्तींशी बोलूनही मन मोकळं करतं आणि मग आपोआप मनाचा निचरा होत जातो. निचरा झालेली मने, मन मोठं ठेवून वागतात.

मनाचा निचरा करूया...
Agriculture Electricity : शेतीला दिवसा वीजपुरवठ्याचे रहस्य

आजकाल आपण पाहतो संकुचित मने सतत व्याकुळतेत जगतात. काहींना तर सुख टोचतं. सारं काही असूनही जे नाही त्याकडे अधिक लक्ष ही माणसं देतात आणि दुःखी, कष्टी होऊन जीवन जगतात. मनाचा निचरा न झाल्यास मग समुपदेशनाची गरज भासू लागते. स्वतःहून मनाचा निचरा करायला हवा. आयुष्यात एक्सट्रीमला (अति उच्च टोकाला) न जाताही खूप आनंदी राहता येतं. एखाद्या गोष्टीचा खूप खोलवर विचार केला तर मनातील ताण वाढत जातो.

मनाचा निचरा करूया...
Agriculture Electricity : चंद्रपूर, गडचिरोली, गोंदियात शेतीला मिळणार दिवसा वीज

मन विशाल असावं. स्वतःजवळ असणाऱ्‍या भौतिक गोष्टींमध्ये काही लोकांचा खूप जीव असतो. आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट जर कुणी मागितली तर आपला मोह त्या वस्तूमधून निघत नाही. व्यक्तीपेक्षा ती वस्तू आपल्याला मोठी वाटते. मनाने मोठ्या असणाऱ्या माणसांजवळ सहजता आणि त्यागी वृत्ती असते.

खूप छोट्या छोट्या गोष्टी आपण मनावर घेतो. मनाला सतत त्याच त्या गोष्टींनी ताण येतो. अशावेळी मन जर मोकळं नाही झालं तर मग खूप अस्वस्थ होतं. आध्यात्मिक प्रगती झालेली असेल तर कठीण प्रसंगात मनाचा निचरा आपोआप होतो. आपण ऐकतो, वाचतो की देवांना, संतानाही संघर्ष चुकला नाही. मग या संघर्षात स्थिर राहण्यासाठी असं त्यांच्याकडे काय होतं. तर त्यांची आध्यात्मिक शक्ती एवढी बळकट असायची की त्यामुळे मनाचा निचरा सहज घडून यायचा.

आपण नेहमी आपल्या ‘कम्फर्ट झोन’मध्ये मध्ये राहतो. म्हणजे आपल्या ओळखीच्या व्यक्तींसमवेत राहतो. कम्फर्ट झोनच्या बाहेर गेल्यावर आपण निराश होतो. कधीकधी अनोळखी असणाऱ्‍या लोकांसोबतही संवाद साधायला हवा. त्यामुळे त्यांचे विचार समजतात. नव्याने ओळख होते. सतत ओळखीच्यांसमवेत आपण ठरवून, प्लॅनिंग करून फिरत असतो. आणि ही सवय आपल्याला इतकी असते की, जर ओळखीची व्यक्ती सोबत नसली तर आपण अस्वस्थ होतो. म्हणून कधीकधी कम्फर्ट झोनच्या बाहेर पडून जग पाहायला हवं. तेव्हा आपल्याला जाणवेल की, जग खूप सुंदर आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com