Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

Leopard Terror : घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भडाणे, रायपूर, वागदर्डी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्थानिक नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत.
Leopard Terror
Leopard AttackAgrowon
Published on
Updated on

Nashik News : भडाणे (ता. चांदवड) येथील तरुण शेतकरी रामदास आहेर यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

रामदास आहेर हे कामावरून रात्री पायी घरी जात असताना, शिव रस्त्यालगतच्या झाडाझुडपांत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला चढवला. बिबट्याने त्यांना झाडाझुडपांत ओढून नेले. त्याच वेळी काही शेतकरी मोटरसायकलवरून जात असताना त्यांना रस्त्यावर रक्त सांडलेले दिसले.

Leopard Terror
Leopard Rescue : बिबट्याच्या रेक्यूचा थरार ; ड्रोनच्या मदतीने अखेर सापडला जाळ्यात

शेजारीच झाडांमध्ये हालचाल जाणवली. आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, रामदास आहेर बिबट्याच्या हल्ल्यात जखमी अवस्थेत आढळले. आरडाओरडा करून लोकांना जमविण्यात आले; मात्र तोपर्यंत बिबट्याने पळ काढला आणि रामदास आहेर यांचा मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच चांदवड पोलीस व वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. भडाणे, रायपूर, वागदर्डी परिसरात बिबट्याचा वावर असल्याने स्थानिक नागरिक अत्यंत भयभीत झाले आहेत. याआधी बिबट्याच्या हल्ल्यात कुत्री, शेळ्या आणि गायी ठार झाल्या होत्या. मात्र, थेट मनुष्यहानी झाल्याने ग्रामस्थांनी बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

Leopard Terror
Leopard Rescue : दहशत माजवणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात

रामदास आहेर हे अल्पभूधारक शेतकरी असून, केवळ एक एकर शेतीवर कुटुंबाचा चरितार्थ चालविणारे होते. शेतीबरोबरच ते गवंडी कामही करत होते. रात्री गवंडी कामावरून परतताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि कुटुंबाचा आधार हिरावून नेला. त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन विवाहित मुली, एक अविवाहित मुलगी आणि एक मुलगा असा परिवार आहे.

आमदार, तहसीलदारांकडून भेट

या घटनेनंतर आमदार डॉ. राहुल आहेर आणि तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी रामदास आहेर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. आमदार आहेर यांनी तत्काळ शासकीय मदत मिळवून देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. गावातील देविदास आहेर यांनी अत्यंत गरीब कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने भरीव आर्थिक मदतीची मागणी केली आहे. उपवनसंरक्षक उमेश वावरे, सहायक वनसंरक्षक सहाने, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय वाघमारे, वनपाल वैभव गायकवाड, अजय शिंदे, खंदारे, श्रीमती साळवे, श्रीमती मरशिवणे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. बिबट्याला पकडण्यासाठी भडाणे-रायपूर शिवारात दोन पिंजरे लावण्यात आले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com