Kanyadan Yojana : सांगली ‘डीसीसी’ची लेक लाडकी कन्यादान योजना

Sangli DCC Bank : गतवर्षी दुष्काळ तर यंदा अतिपाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा दुहेरी अडचणीच्या परिस्थितीत जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.
Sangli DCC Bank
Sangli DCC BankAgrowon
Published on
Updated on

Sangli News : गतवर्षी दुष्काळ तर यंदा अतिपाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा दुहेरी अडचणीच्या परिस्थितीत जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. बँकेने विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलीच्या लग्नासाठी विना परतावा दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याची निर्णय घेतला असल्याची घोषणा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी मंगळवारी (ता. २७) झालेल्या सर्वसाधारण वार्षिक सभेत केली.

जिल्हा बँकेची ९७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, या वेळी भासदांना मार्गदर्शन करताना आमदार नाईक बोलत होते. या वेळी उपाध्यक्षा जयश्री पाटील, खासदार विशाल पाटील, ज्येष्ठ संचालक मोहनराव कदम, अजितराव घोरपडे, संग्रामसिंह देशमुख, महेंद्र लाड, प्रकाश जमदाडे, तानाजी पाटील, सुरेश पाटील, वैभव शिंदे, अमोल बाबर, बाळासाहेब होनमोरे, बी. एस. पाटील, मन्सूर खतीब, चिमण डांगे, राहुल महाडिक, अनिता सगरे, मनोज शिंदे, रामचंद्र सरगर, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ उपस्थित होते.

Sangli DCC Bank
Sangli DCC Bank : जिल्हा बॅंक कर्मचाऱ्यांना १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ

अध्यक्ष आमदार नाईक म्हणाले, की जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे. जिल्हा बँकेकडून दोन लाख ९० हजार कर्जदार शेतकऱ्यांचा अपघाती विमा उतरवला आहे. यापूर्वी मुलींच्या लग्नासाठी ५० हजार रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे.

विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये विना परतावा मदत देण्यात येणार आहे. त्यासाठी बँकेने दहा कोटी रुपयांची तरतूद केली आहे. बँकेला मिळालेल्या नफ्यावर आयकर भरावा लागतो. आयकर भरण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी दिले तर त्यांना आधार मिळेल, हे लक्षात घेऊन बँकेच्या संचालक मंडळाने मदतीचा निर्णय घेतला आहे.

Sangli DCC Bank
Dharashiv DCC Bank : थकबाकीदार संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची हजेरी

विमा योजनेच्या धर्तीवर आणखी योजना राबविण्याचा विचार

गतवर्षीचा दुष्काळ आणि यंदा झालेली अतिवृष्टी यामुळे शेतकरी दुहेरी अडचणींना सामोरे जात आहे. शेतकरी विमा योजनेच्या धर्तीवर आणखी योजना आणता येते का? याबाबतही बँकेकडून चाचपणी करण्यात येत असल्याचे आमदार नाईक यांनी सांगितले.

बँकेचे २५० कोटी नफ्याचे उद्दिष्ट

जिल्हा बँकेला २०२३-२४ आर्थिक वर्षात २०४ कोटी रुपयांचा ढोबळ नफा झाला आहे. सध्या बँकेकडे साडेसात हजार कोटींच्या ठेवी असून ६ हजार ९५० कोटींचे कर्जवाटप झाले आहे. चालू आर्थिक वर्षात ९ हजार रुपयांच्या ठेवी, साडेसात हजार कोटी कर्जवाटप आणि एनपीए शून्य टक्क्यावर आणण्याचा प्रयत्न आहे. बँकेला २५० कोटींचा नफा मिळविण्यासाठी नियोजन करण्यात येत असल्याचे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com