Cooperative Policy : कायदेशीर सुधारणा सहकाराला बळ देतील

Cooperative Department : केंद्र व राज्याच्या सहकार कायद्यात चालू असलेल्या सुधारणांमुळे सहकार चळवळीत अनेक नवे प्रारूप समाविष्ट होतील.
Dilip walase-Patil
Dilip walase-PatilAgrowon
Published on
Updated on

Pune News : केंद्र व राज्याच्या सहकार कायद्यात चालू असलेल्या सुधारणांमुळे सहकार चळवळीत अनेक नवे प्रारूप समाविष्ट होतील. तसेच, गावपातळीवरील संस्थांच्या बळकटीकरणासाठी भागभांडवल व संसाधने मिळतील, असे प्रतिपादन राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेच्या (वॅमनीकॉम) ५७ व्या स्थापना दिन सोहळ्यात सहकार मंत्री वळसे पाटील प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

राष्ट्रीय दुग्ध व्यवसाय विकास मंडळाचे (एनडीडीबी) अध्यक्ष डॉ. मीनेश शहा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, वॅमनीकॉमच्या संचालिका डॉ. हेमा यादव, प्रबंधक डॉ. आर. के. मेनन, सहयोगी प्रा. डॉ. वाय. एस. पाटील, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष प्रा.दिगंबर दुर्गाडे व्यासपीठावर तसेच सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, शिखर बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक बी. एम. दिघे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Dilip walase-Patil
Cooperative Credit Society : सोसायट्यांमधील हेराफेरीला संगणकीकरणामुळे चाप

श्री. वळसे म्हणाले, ‘‘केंद्राने आणलेल्या नव्या सहकार धोरणामुळे विविध कार्यकारी सोसायट्यांना १८२ प्रकारच्या सेवा देता येतील. नवे धोरण अमलात आणण्यासाठी केंद्राने समिती स्थापन केली आहे. राज्यानेदेखील या धोरणाला सुधारणांसहित तळागाळात नेण्यासाठी समिती नियुक्त केली आहे. सहकारातील सर्व संस्थांच्या विकासासाठी सर्व बाजूने विचार केला आहे.’’

एनडीडीबीचे अध्यक्ष डॉ. शहा म्हणाले की, सहकाराच्या तत्त्वावर देशाचा डेअरी उद्योग उभा आहे. त्यामुळे आठ कोटी कुटुंबांचे संगोपन होते. सहकारातील ‘आनंद पॅटर्न’ नफ्यातील ८० टक्के वाटा उत्पादकाला मिळवून देतो. सहकारावर आधारित डेअरीमधील मूल्यसाखळी इतर शेतीमालात नेण्याचे ध्येय केंद्राने ठेवले आहे.

त्यासाठी निर्यात वाढ, बियाणे उद्योग आणि सेंद्रिय उत्पादने अशा तीन क्षेत्रांसाठी केंद्राने बहुराज्यीय सहकारी संस्था स्थापन करण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांमधून शेतकऱ्यांना उत्पादन ते विक्री असे संपूर्ण मार्गदर्शन दिले जाणार आहे.’’

Dilip walase-Patil
Cooperative Policy : राज्याच्या सहकार धोरणात होणार बदल

वॅमनीकॉमच्या संचालिका डॉ. यादव म्हणाल्या, ‘‘सहकार व्यवस्थापनावरील पदव्युत्तर (एमबीए) अभ्यासक्रम पुणे विद्यापीठ व वॅमनीकॉमकडून संयुक्तपणे राबविला जाणार आहे. सहकाराला डोळ्यासमोर ठेवत आम्ही उद्योजकता विकास संगोपन (इन्क्युबेशन सेंटर) केंद्र सुरू केले आहे. तसेच देशातील सहकार सुधारणा तसेच विविध कार्यकारी सोसायट्यांच्या बळकटीकरणाच्या प्रक्रियेत वॅमनीकॉम मदत करतो आहे.’’

सहकारमंत्र्यांनी ‘या’ सुधारणा होण्याचे दिले संकेत

- सहकाराची नवी मॉडेल्स् (प्रारूप) लवकरच येतील.

- तळागाळातील सहकार सशक्त करण्याची तरतूद.

- सहकारी संस्थांना भागभांडवल व संसाधनांचा पुरवठा

- आदर्श कामगिरी करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन देणार.

- संस्थांमधील मनुष्यबळ उपयुक्ततावाढीसाठी व्यवस्थापन व प्रशिक्षण.

- सोसायंट्यांमधील सचिव व संचालकांच्या जबाबदारीत वाढ.

- सोसायट्यांच्या सेवांचे विस्तारीकरण, पंचायत स्तरावर नोंदणी.

- धान्य साठवणुकीची क्षमता वाढवण्यासाठी सहकाराची मदत.

- सहकारातील बॅंकिंग व्यवस्थेत सकारात्मक बदल.

- सहकारी साखर कारखान्यांच्या प्रकल्पांना आर्थिक मदत.

- निर्यात, बियाणे, जैविक शेतीत सहकाराचा सहभाग.

- सहकारासाठी लवकरच मोठे विद्यापीठ साकारणार.

- पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेकडून प्रशिक्षणासाठी उपक्रम.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com