Electricity Issue : कुंपणात वीजप्रवाह सोडल्यास गुन्हा दाखल

Farmer Issues : वन्यप्राण्यांबरोबरच शेतात कामासाठी गेलेल्या आणि अनवधानाने कुंपणास स्पर्श करून अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
Electricity Department
Electricity DepartmentAgrowon
Published on
Updated on

Amravati News : वन्यप्राण्यांपासून होणारी पिकांची नासाडी रोखण्यासाठी काही शेतकरी कुंपणात वीजप्रवाह सोडतात. परंतु त्यामुळे वन्यप्राण्यांबरोबरच शेतात कामासाठी गेलेल्या आणि अनवधानाने कुंपणास स्पर्श करून अनेक शेतकऱ्यांचा मृत्यू ओढवत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. याची महावितरणने गंभीर दखल घेतली असून यापुढे कुंपणात अनधिकृत वीजप्रवाह सोडलेला आढळल्यास संबंधितावर विद्युत कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

Electricity Department
Electricity Consumption Rates : महाराष्ट्राची दिवाळी देशात सर्वाधिक महागडी

गेल्या काही महिन्यांपासून विजेचा शॉक लागून अनेक शेतकऱ्यांच्या मृत्यूच्या घटना वारंवार घडत आहेत. याची अधिक खोलात जाऊन चौकशी केली असता महावितरणच्या असे लक्षात आले, की शेतकरी पिकाच्या संरक्षणासाठी आकडे टाकून थेट विजेच्या तारांवरून वीजप्रवाह कुंपणात सोडतात. त्यामुळे अनवधानाने संपर्कात आलेल्या प्राण्यांसोबत शेतकऱ्यांचेही मृत्यू होत असल्याचे उघडकीस आले आहे.

Electricity Department
Central Electricity Department : सर्वच स्तरातून शेती धोक्यात? पाणी सकंटाबरोबर आता वीज संकट, केंद्राकडून राज्यांना सूचना

एकंदरीत हा प्रकार वाटतो तितका साधा नसून वीजचोरी बरोबरच सदोष मनुष्यवध यांसारख्या गंभीर गुन्ह्यांशी संबंधित आहे. तसेच जीवितहानी झाल्यानंतर त्याचा दोष विनाकारण महावितरणकडे देण्याचा आणि महावितरणकडून भरपाई मागण्याचा कल दिसून येत आहे, असेही महावितरणने म्हटले आहे.

अनधिकृत आकडे टाकून कुंपणात वीजप्रवाह सोडण्याच्या या गंभीर प्रकाराला आळा घालण्यासाठी महावितरणने कायदेशीर कारवाई करण्याचे ठरविले आहे. तांत्रिक कर्मचारी तसेच भरारी पथकाच्या माध्यमातून शेतशिवारात गस्त घालण्यात येणार आहे. असा प्रकार आढळला तर संबंधित शेतकऱ्यांवर विद्युत कायदा २००३ च्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. तसेच संभाव्य जीवितहानीची शक्यता लक्षात घेऊन संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची विनंती पोलिस विभागाला करण्यात येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com