
Latur News : जिल्ह्यातील वनक्षेत्राचे प्रमाण राज्यात सर्वात कमी आहे. हे प्रमाण वाढवण्यासाठी यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे.
ही मोहीम लोकचवळव व्हावी, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यामुळे स्वयंसेवी संस्थांसह समाजातील सर्व घटकांनी वृक्ष लागवड मोहिमेत सहभागी होऊन पर्यावरण संतुलनाचा वसा जपावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी केले. जागतिक पर्यावरण दिनाच्या पूर्वसंध्येला बुधवारी (ता. चार) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
अपर जिल्हाधिकारी शिल्पा करमरकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी अमितराज जाधव, सहायक वनसंरक्षक मदन क्षीरसागर, वन विभागाचे नीलेश बिराजदार यांच्यासह पर्यावरण क्षेत्रात कार्यरत विविध स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होणे आवश्यक आहे. प्रत्येकाने आपल्या घरासमोर किंवा अंगणात झाडे लावून ही मोहीम यशस्वी करण्यासाठी योगदान द्यावे.
जिल्ह्याला हरित जिल्हा अशी नवी ओळख निर्माण करण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य महत्त्वपूर्ण आहे. यासाठी नागरिकांनी वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी ठाकूर यांनी केले. या वेळी उपस्थितांना जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ दिली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.