Loksabha Election 2024 : लंके यांनी घेतली निर्णायक आघाडी

Nagar South Loksabha Assembly : नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात १४ व्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली.
Nilesh Lanke And Sujay Vikhe
Nilesh Lanke And Sujay VikheAgrowon
Published on
Updated on

Nagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात १४ व्या फेरीअखेर महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांच्यामध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. प्रशासनाकडून उशिराने अधिकृत आकडेवारी जाहीर केली जात असल्यामुळे नेमकी आघाडी कळत नव्हती, मात्र कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार अकराव्या फेरीअखेर नीलेश लंके यांनी दहा हजारांपेक्षा अधिक मतांची आघाडी घेतल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे नीलेश लंके विजयी होतील, असा अंदाज बांधून कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला.

Nilesh Lanke And Sujay Vikhe
Lok Sabha Election : 'अमर्याद पुरुषोत्तमा'चा मर्यादित विजय

शिर्डी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे नव्या फेरी अखेर २० हजारांपेक्षा अधिक मतांनी आघाडीवर होते. शिर्डीच्या मतमोजणीच्या २३ फेऱ्या तीन वाजता पूर्ण झाल्या. मात्र अधिकृत आकडेवारी जाहीर केली गेली नाही. कार्यकर्त्यांनी सांगितलेल्या आकडेवारीनुसार भाऊसाहेब वाकचौरे जवळपास ४५ हजारांपेक्षा अधिक आघाडी घेऊन विजयाच्या उंबरठ्यावर होते.

शिर्डी लोकसभा मतदारसंघांमध्ये वंचितच्या उत्कर्षा रूपवते यांनीही नवव्या फेरीअखेर एक लाखापेक्षा अधिक मते घेतली होती. मात्र या मताचा वाकचौरे यांना विजयाकडे घेऊन जाणाऱ्या मतावर कुठलाही परिणाम झाला नाही. नगर जिल्ह्यातील नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मंगळवारी (ता. ४) एमआयडीसी भागातील सरकारी गोडाऊनमध्ये मतमोजणी झाली. सहा विधानसभा मतदारसंघासाठी एकूण १४ टेबल मतमोजणीसाठी उभे केले होते.

Nilesh Lanke And Sujay Vikhe
Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निकालानंतर कोण काय म्हणाले?

मतदारसंघात उमेदवारांना मिळालेली

मते (१४ व्या फेरीअखेर)

नगर लोकसभा मतदारसंघ

डॉ. सुजय विखे पाटील (भाजप) : ३,४८,५२७

नीलेश लंके (राकाँप शरदचंद्र पवार) : ३,६३,८४८

शिर्डी लोकसभा मतदारसंघ (अंतिम फेरीअखेर)

सदाशिव लोखंडे (शिवसेना) : ४,२५,४९८

भाऊसाहेब वाकचौरे (शिवसेना उबाठा) : ४,७५,६३७

उत्कर्ष रूपवते (वंचित बहुजन आघाडी) : ९०,७४८

पाणी, कांदा, दूध दरासह शेती प्रश्न चव्हाट्यावर

नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांमधील शेती आणि पाण्याचा प्रश्न हे दोन मुद्दे अत्यंत प्रभावी ठरले तालुक्यातील निळवंडे धरण आणि कालव्याचा प्रश्न सर्वाधिक चर्चेला गेला. सर्व पक्षाच्या नेत्यांनी निळवंड्याच्या कालव्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. याशिवाय दोन्ही मतदारसंघांमध्ये दूध दर, कांद्याचा प्रश्नांवरून तीव्र नाराजी असल्याचे दिसून आली. नगर दक्षिणेमधील साकळायी योजना, शेवगाव तालुक्यातील गाजणापूर योजनेचा प्रश्न चर्चिला गेला. पाणी आवर्तनाचा प्रश्नाचा परिणाम मतावर झाला असल्याचे मतमोजणीत पाहायला मिळाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com