
Marathi Medium School In Maharashtra : प्राथमिक शाळेत किती आणि कोणत्या भाषा शिकवायच्या या प्रश्नाच्या चर्चांच्या संदर्भात आमच्या पिढीने कोणत्या भाषेत प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण घेतले यातून मिळणारी अंतर्दृष्टी उपयोगी ठरेल. स्वातंत्र्याआधी आणि स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकात जन्मलेल्या पिढ्यांमधील जवळपास सर्वजण मराठी माध्यमातच शिकले आहेत.
प्राथमिक शाळेत फक्त मराठी एकच भाषा होतीच. माध्यमिक शाळेत हिंदी आणि इंग्रजी भाषा आल्या. पण इतिहास, भूगोल, विज्ञान, गणित सर्वच विषय मराठी भाषेतच शिकवले गेले. शहरीच नव्हे तर अगदी ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळांतून हेच मॉडेल होते.
सर्व पातळीवरील प्रशासन , शिक्षण, वैद्यकीय, संशोधन, सर्व प्रकारचे इंजिनिअरिंग, बँकिंग, विमा, औद्योगिक उपक्रम, इंग्रजी पत्रकारिता, हिंदी सिनेमा, मराठी साहित्य, काव्य, नाट्यक्षेत्र आदी विविध क्षेत्रांत २००० नंतर आपल्या देशाने प्रगतीची इमारत उभारली आहे त्याचा भरभक्कम पाया मराठी माध्यमात शिकलेल्या आमच्या आणि आधीच्या पिढ्यांनी घातला होता.
हेच आपल्या देशातील इतर भाषिक प्रांतांना देखील लागू होते हे पुन्हा पुन्हा अधोरेखित केले पाहिजे. त्यातून हा संकुचित एक भाषा विरुद्ध दुसरी भाषा असा मुद्दा नसून तात्त्विक भूमिका आहे हे प्रभावीपणे बिंबवता येईल.
लक्षात घ्यायचा भाग हा की या पिढ्यांनी इंग्रजी, हिंदी भाषा आणि वेळ पडलीच तर परकीय भाषा देखील माध्यमिक शाळेपासून नंतरच्या वयात आत्मसात केल्या, प्रावीण्य मिळवले आणि आपल्याला क्षेत्रात भरीव कामगिरी केली.
शिक्षक नेहमीच होते. त्यांचे योगदान कोण नाकारेल? पण त्यापेक्षा जास्त असते स्वशिक्षण. त्यापेक्षा जास्त महत्त्वाचे ठरते खूप काही शिकायची, आत्मसात करायची, काही तरी करून दाखवण्याची ईर्षा, आकलन शक्ती, विचार क्षमता. त्यासाठी बालवयात लहान मुलामुलींची व्यक्तिमत्त्वे फुलली पाहिजेत.
त्याची पायाभरणी लहान मुलांच्या नकळत प्राथमिक शाळांमधून होत असते. मानसिक, शारीरिक वाढ. फुलणे, बहरणे, आपण कोणीतरी आहोत याचे आत्मभान येणे या सगळ्यांची बीजे याच वयात पेरली जात असतात. एकदा या वयातील नाजूक रोपांनी स्वतःची मुळे पकडली की ती रोपे स्वतःच झाड बनतात.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.