Buffer Zone Land: बफर झोनमधील जमिनी घेणार भाडेतत्त्वावर : बावनकुळे

Revenue Minister Bawankule: विदर्भातील बफर झोनमधील शेतजमिनी सरकार सौर प्रकल्प व वन्यजीव संरक्षणासाठी ५० हजार रुपये प्रति एकर दराने भाडेतत्त्वावर घेणार आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी नागपुरात ही माहिती दिली.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleAgrowon
Published on
Updated on

Nagpur News: ‘‘विदर्भात वन्यक्षेत्र मोठे असून जंगललगतच्या बफर झोनमधील शेतजमिनी सरकार सौरऊर्जा प्रकल्पासाठी भाडेतत्वावर घेणार आहे,’’ अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

नागपुरात मंगळवारी (ता.१७) माध्यमांशी ते बोलत होते. श्री. बावनकुळे म्हणाले, की पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्हे हे जंगलव्याप्त आहेत. गडचिरोली जिल्ह्याचा ७० टक्‍के भाग हा जंगलाने व्यापलेला आहे. वनक्षेत्रामुळे या भागात वन्यप्राण्यांचा वावर ही वाढता आहे. त्यामुळेच या भागात व्याघ्र प्रकल्पांचे प्रमाण अधिक आहे.

Chandrashekhar Bawankule
Revenue Lok Adalat: घोडेगावला महसूल लोक अदालतीत ५२ प्रकरणे निकाली

यातूनच वनक्षेत्रानजीक असलेल्या बफर झोनमधील शेती आणि गावांमध्ये मानव-वन्यजीव संघर्ष वाढत त्यातूनच सामान्यांचे बळी जाण्याचे प्रकार वाढले आहेत. या सर्व बाबींची दखल घेत वनक्षेत्राला लागून असलेल्या तसेच बफर झोनमधील जमिनी शेतकऱ्यांकडून ५० हजार रुपये एकर प्रमाणे भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव आहे.

मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेअंतर्गत या जमिनी आम्ही घेणार आहोत. या परिसरात बांबू सोबतच चारा पिकांची लागवड केली जाईल. या माध्यमातून वन्यप्राण्यांना चराईसाठी कुरणाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. या उपायातून शेतकरी, शेतमजुरांचा जीव वाचण्यास मदत होईल, असा विश्‍वास श्री. बावनकुळे यांनी व्यक्‍त केला. सर्व बफर जमिनी भाडेतत्त्वावर घेण्याची तयारी सरकारने सुरू केल्याचेही त्यांनी सांगितले.

Chandrashekhar Bawankule
Revenue Department Reform: दस्त नोंदणी चुकल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार: चंद्रशेखर बावनकुळे

‘नुकसान भरपाई देणार’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत नुकसानीसंदर्भात आढावा घेतला. त्यानंतर आता शासन नुकसान भरपाईसाठी सकारात्मक असून त्या पार्श्‍वभूमीवर सर्व्हेक्षण व पंचनामे केले जाणार आहेत, असेही श्री. बावनकुळे यांनी सांगितले.

शेतीक्षेत्र जुन्या महसुली कायद्यातून मुक्‍त व्हावे यासाठी महसुली कायद्यात सुधारणांवर भर देण्यात आला आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासोबतच आता बफर झोनमधील शेतकरी, शेतमजुरांचा जीव वाचावा याकरिता ही शेती भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com