Crop Damage Survey : पिकांच्या नुकसानीचे पंचनामे व्यवस्थित करा

heavy Rain Crop Loss : तसेच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी  खते व बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.
Crop Damage Survey
Crop Damage SurveyAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान होते. या नुकसानीचे पंचनामे वेळेत करा. कोणत्याही शेतकऱ्याची  याबाबत तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खते व बियाण्यांचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी  खते व बियाणे वेळेत उपलब्ध करून द्यावे, असे निर्देश पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात खरीप हंगाम -२०२५ आणि नैसर्गिक आपत्तीच्या अनुषंगाने गुरुवारी (ता. १२) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितू खोकर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, निवासी उपजिल्हाधिकारी शोभा जाधव, उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांची उपस्थित होते.

जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली तर पूर बांधितांच्या मदतीसाठी आवश्यक असणारे साहित्य उपलब्ध करून घ्यावेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जिल्ह्यात आवश्यक त्या ठिकाणी वीज अटकाव यंत्र बसवावेत. तसेच ज्या ठिकाणी पर्जन्यमापक यंत्राची गरज आहे. त्या ठिकाणी यंत्रे लावण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

बाधित शेतकरी व नागरिक यांना व्यवस्थित मदत करण्यासाठी वस्तुनिष्ठ नुकसानीचे पंचनामे करावे. त्यामुळे बाधितांना शासनाकडून योग्य मदत करता येणार असल्याचे श्री. सरनाईक यांनी सांगितले. खरीप हंगामात शेतकऱ्यांना वेळेत खते व बियाणे मिळाले पाहिजे.

खतांची साठवणूक करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी. बियाण्यांच्या पॅकेटमधून कमी बियाण्यांचा पुरवठा करू नये. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही. जिल्ह्यात वनक्षेत्र अत्यंत कमी आहे. त्यामुळे वनक्षेत्र वाढीसाठी नियोजनातून वृक्ष लागवड करण्यात यावी.

वनक्षेत्र वाढीसाठी प्रत्येकाने आपला खारीचा वाटा उचलाव. केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांतून वनीकरण वाढवावे. वृक्ष लागवडीत मोहिमेत बांबू लागवड करण्यात यावी. वृक्ष लागवडीत यापूर्वी ज्यांनी चांगले काम केले आहे. त्यांना सन्मानित करण्यात यावे, अशी सूचना सरनाईक यांनी केली.

भरपाईसाठी साडेनऊ कोटींची गरज

जिल्ह्यातील १५९ गावे नदीकाठावर आहे. त्यापैकी १५ गावे अंशतः पूरप्रवण आहे. जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात पूर बचाव साहित्य उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी पुजार यांनी सांगितले. मेमध्ये २९८ टक्के झाला असून त्याची सरासरी २५.९ मिमी इतकी आहे. जून २०२५ मध्ये १० जूनपर्यंत ५४ टक्के पाऊस झाला असून त्याची सरासरी ४६.७ मिमी इतकी आहे.

जिल्ह्यात मेमध्ये ३४ मंडळात अतिवृष्टी झाली. एप्रिलमध्ये अवेळी पाऊस, वादळीवारा व गारपिटीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेले ४३४ शेतकऱ्यांचे जिरायत, बागायत व फळपिकांचे २९४ .४२ हेक्टरवर नुकसान झाले असून भरपाईसाठी एक कोटी तीन लक्ष रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे.

नऊ खते परवाने कायमस्वरूपी रद्द

पावसामुळे ११० गावे बाधित झाले. तीन व्यक्तींचा मृत्यू झाला तर ३ जण जखमी झाले. ८ लहान, तर ५३ मोठे दुधाळ जनावरे मुख्यतः वीज पडल्याने मृत्युमुखी पडली आहेत. ओढकाम करणारी ११ जनावरे अशी एकूण ७२ जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. पावसामुळे १४७ घरांची अंशतः पडझड झाली. ५ झोपड्या तर २२ गुरांचे गोठे बाधित झाल्याची माहिती जाधव यांनी दिली. 

खरीप हंगामासाठी ११ जूनपर्यंत १०४५.९५ टन युरिया आणि २६० टन डी.ए.पी.उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी माने यांनी दिली. भरारी पथकाने कारवाई करून या हंगामात १० परवाने निलंबित केले. नऊ परवाने कायमस्वरुपी रद्द केले. तीन परवानाधारकांना ताकीद दिली. दोन परवानाधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वाशी तालुक्यात विना परवाना अनधिकृत खतसाठा केल्यामुळे ४ लाख ६१ हजार रुपये किमतीचे २०.२१ क्विंटल खत जप्त करून गुन्हा दाखल केल्याचे माने यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com