Tribal Scheme : केंदूरच्या आदिवासींकडून घरांसाठी जागांची मागणी

Gharkul Yojana : आदिवासी असून आदिवासींच्या योजना मिळत नाहीत. माळीनसारखी स्थिती असताना सरकारकडून जागा मिळेना. फसवी आश्वासने देवून जागा लाटल्या.
Shivaji Adhalrao Patil
Shivaji Adhalrao PatilAgrowon

Pune News : आदिवासी असून आदिवासींच्या योजना मिळत नाहीत. माळीनसारखी स्थिती असताना सरकारकडून जागा मिळेना. फसवी आश्वासने देवून जागा लाटल्या. आता ‘एमआयडीसी’ जराही हालचाल करू देत नाही.

आम्ही वैतागलोय. दादा, तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे चला आणि आम्हाला आमच्या ६ ठाकरवाड्यांची स्वतंत्र ग्रामपंचायतही करून द्यावी,’’ अशी मागणी केंदूर (ता. शिरूर) येथील आदिवासी ठाकर मंडळींनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्याकडे केली.

केंदूर (ता. शिरूर) येथे आदिवासी ठाकर समाजाच्या ६ वस्त्या आहेत. यातील अनेकांना ना जातीचे दाखले ना हक्काचे घर. २००६ मध्ये ‘एईझेड’ने गोड बोलून जागा संपादन केल्या. मात्र घरांसाठी जागाही दिल्या नाहीत.

संपादित जागेवर ‘एमआयडीसी’ने प्रतिबंध लावल्याने सहाही आदिवासी वस्त्या त्रस्त आहेत. आदिवासींच्या योजनाही मिळत नाहीत. याच पार्श्वभूमीवर आढळराव यांनी नुकतीच येथील दोन ठाकरवाड्यांना भेटी दिल्या. या वेळी केंदूरच्या उपसरपंच ज्योती गावडे व पोलिस पाटील सतीश गावडे यांनी सहाही वस्त्यांच्या व्यथा सांगितल्या.

Shivaji Adhalrao Patil
Tribal Development : आदिवासी, सर्वसाधारण क्षेत्राचा समतोल विकास साधणार

दरम्यान, माळीनसारखीच घरस्थिती असलेल्या या वस्त्यांमध्ये दोन वर्षांपूर्वी एका दुर्घटनेत एका बालकाचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे आढळराव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करून ठाकर समाजाच्या सर्व वैयक्तिक लाभाच्या योजनांसह जात प्रमाणपत्रांचे शिबिर पुढील दहा दिवसात या ठाकरवाड्यांमध्ये घेण्याचे निर्देश दिले.

Shivaji Adhalrao Patil
Tribal Development : आदिवासी विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करा

या शिवाय सोमवारी (ता. २२) थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात ठोस कार्यवाहीसाठी बैठक आयोजित करीत असल्याची माहिती आढळराव यांनी दिली. या वेळी शिवसेनेचे तालुकाप्रमुख अरुण गिरे, पंचायत समिती सदस्य रवींद्र करंजखेले आदी उपस्थित होते.

‘सहा वस्त्यांचे प्रश्‍न ‘जैसे थे’’

आमच्यावर शासनाकडून अन्याय होतोय. सहा वस्त्या असून आम्हाला स्वतंत्र आदिवासींची अशी ग्रामपंचायत करून द्यावी. त्यामुळे आम्हाला स्वतंत्रपणे आदिवासींच्या योजना मिळतील. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य न्याय द्यावा, अशी मागणी उपसरपंच ज्योती गावडे यांनी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com