Tribal Development : आदिवासी विकासाच्या योजनांची अंमलबजावणी करा

IAS Ayush Prasad : सरकारी योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विभागाने भर द्यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या.
IAS Ayush Prasad
IAS Ayush PrasadAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागामार्फत समाजातील वंचित, दुर्लक्ष‍ित घटकांसाठी विविध योजनांचा लाभ तळागाळातील लाभार्थ्यांपर्यत पोचविण्यासाठी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर विभागाने भर द्यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शुक्रवारी येथे दिल्या.

महाबळ येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सामाजिक न्याय व आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची आढावा बैठक शुक्रवारी (ता.१२) झाली. यावल उप वनसंरक्षक जमिर शेख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी,

IAS Ayush Prasad
Milk Subsidy : दुधासाठी प्रतिलिटर ५ रुपये अनुदान योजनेचा लाभ घ्यावा : डॉ. शिंदे

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प अधिकारी राजेश एस.लोखंडे, समाज कल्याण सहायक आयुक्त योगेश पाटील, यावल आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी अरुण पवार आदी उपस्थित होते. नगरपालिकेचे मुख्याधिकारी व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

IAS Ayush Prasad
Governments Land Purchase : सरकारची नवी योजना, जमीन खरेदीसाठी बिनव्याजी कर्ज आणि ५० टक्के अनुदान

जिल्हाधिकारी प्रसाद म्हणाले की, मुख्याधिकाऱ्यांनी शहर व नगरपालिका स्तरावरील जातिवाचक वस्त्यांची नावे तत्काळ बदलण्याबाबत कार्यवाही करावी. पंचायत समिती व नगरपालिकेने रमाई आवास, मोदी आवास व नमो ११ सूत्री कार्यक्रमांबाबत तत्काळ उद्दिष्टे पूर्ण करावे.

सामाजिक न्याय विभागाच्या विविध समित्यांमधील जिल्हा दक्षता समिती, रमाई आवास घरकुल योजना, मोदी आवास घरकुल योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना, नमो अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांची वस्ती सन्मान अभियान, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, जिल्हा सल्लागार महिला समिती आढावा व स्वाभिमान सबलीकरण योजनांची अंमलबजावणी अशा विषयांचा आढावा घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com