Ujani Dam : ‘उजनी’तून ‘भीमे’तील विसर्ग थांबला, धरणाचे १६ दरवाजे बंद

Ujani Water Storage : उजनी धरणाच्या वरच्या धरणाकडून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उजनी धरणाच्या वरच्या धरणाकडून पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात आले आहे. तसेच हे पाणी सोडण्यासाठी धरणाचे १६ दरवाजे उघडण्यात आले होते, तेही आता बंद करण्यात आले आहेत. पण कालव्याचे पाणी मात्र १० ऑक्टोबरपर्यंत सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.

उजनी धरणाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील धरणाच्या कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने तिकडील अतिरिक्त पाणी गेल्या जवळपास महिनाभरापासून उजनी धरणात सोडण्यात येत होते. त्यामुळे उजनी धरण १०६ टक्क्यांपर्यंत भरले.

Ujani Dam
Ujani Dam : उजनी धरणातून भीमा नदीत सोडलेला विसर्ग घटला

पण उजनी धरणात शंभर टक्क्यांहून अधिक पाणीपातळी झाल्याने उजनी धरणातील पाण्याचे नियंत्रण करण्याच्या दृष्टीने उजनीतून पुढे भीमा नदीत पाणी सोडण्यात येत होते. पण सध्या पाऊस थांबल्याने आणि विसर्गही कमी झाल्याने नदीतील विसर्ग पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. गेल्या ३७ दिवसांत ९३ टीएमसी पाणी नदीत सोडण्यात आले.

Ujani Dam
Ujani Dam : उजनी धरणाबाबत मोठी अपडेट समोर, उन्हाळ्यात अशी राहणार स्थिती

सध्या उजनी धरणातून सीना-माढा उपसा योजनेसाठी १७५ क्युसेक, दहिगाव योजनेसाठी ८० क्युसेक, मुख्य कालव्याला १६०० क्युसेक आणि बोगद्याला २०० क्युसेक इतके पाणी सोडण्यात येत आहे. कालव्याला सोडले जाणारे पाणी साधारण १० ऑक्टोबरपर्यंत कायम ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर जानेवारीअखेर किंवा फेब्रुवारीमध्ये शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात येणार आहे, असे सांगण्यात आले.

उजनीत १०६ टक्के पाणी

पाण्याच्या सततच्या विसर्गामुळे उजनी धरणातील पाणीपातळी यंदा शंभर टक्क्यांवर पोहोचली आहे. शनिवारी (ता. १४) उजनी धरणाची एकूण पाणीपातळी ४९७.१०० मीटरपर्यंत राहिली. तर पाण्याचा एकूण साठा १२०.४७ टीएमसी, तर त्यापैकी उपयुक्त साठा ५६.८१ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी १०६.४ टक्क्यांपर्यंत राहिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com