Fishing : नव्वदाव्या वर्षाही लक्ष्मीबाई जगतात स्वावलंबी जीवन

Self Reliant Life : जगण्याची आणि नवे काही तरी करण्याची उमेद असली, तर त्यात वय अडसर ठरत नाही, हा विश्‍वास नेर तालुक्‍यातील ९० वर्षांच्या तरुणीने जागविला आहे.
Fishing
Fishing Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : जगण्याची आणि नवे काही तरी करण्याची उमेद असली, तर त्यात वय अडसर ठरत नाही, हा विश्‍वास नेर तालुक्‍यातील ९० वर्षांच्या तरुणीने जागविला आहे. लक्ष्मीबाई रामकृष्ण नेमाडे असे त्यांचे नाव आहे. वय झाल्यावर मुलाबाळांवर अवलंबून राहणाऱ्या ज्येष्ठांसाठी त्या आदर्श ठरल्या आहेत. मासेमारी व्यवसाय करीत त्या स्वावलंबी जीवन जगण्याचे उत्तम उदाहरण ठरल्या आहेत.

अमुकच काम मी करणार, हे काम माझ्या लायकीचे नाही, अशी अनेक कारणे सांगत कामापासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न अनेकांकडून होतो. त्यातूनच हाताला पैसा मिळत नसल्याने त्यांची कोंडी होते. यातून नैराश्‍य आणि व्यसनाधीनताही वाढीस लागते. नेरच्या ९० वर्षीय लक्ष्मीबाई मात्र अशा युवांसाठी प्रेरणा ठरत आहेत.

Fishing
Fish Farming : मत्सपालनात या जातींमुळे बदलेले नशीब...

९० वर्षांच्या व्यक्‍तीचे जीवन म्हणजे उतारवयात सेवानिवृत्तीनंतरचा आरामदायी काळ. बहुतांश व्यक्‍ती नातवंडे, कुटुंबीयांच्या संगतीत हा काळ घालवितात. परंतु ‘‘संघर्षाशिवाय माणसाच्या जीवनातील प्रश्‍न सुटत नाही,’’ असे सांगणाऱ्या लक्ष्मीबाई पारंपरिक मासेमारीचा व्यवसाय आजही करतात.

Fishing
Fish Specie : प्रदूषणामुळे ४८ मत्‍स्य प्रजाती नामशेष?

लक्ष्मीबाई ५५ वर्षांच्या असताना त्यांच्या पतीचे निधन झाले. यातूनच कुटुंबीयांची जबाबदारी आल्याने त्यांनी मासेमारीचे काम सुरू ठेवले. मासे विक्रीतून मिळणाऱ्या पैशातून मुलांना मोठे केले. त्यांना सदाशिव (वय ६०), दुसरा रमेश (वय ५८), तिसरी मुलगी शकुना तायडे (वय ५६), चौथा चंद्रभान (वय ५४), पाचवा सुधाकर (वय ५२) अशी मुले आहेत.

यातील लहान मुलगा सुधाकरकडे लक्ष्मीबाई राहतात. परंतु वयाच्या उतारवयातही इतरांवर अवलंबून राहावे लागू नये, याकरिता त्यांनी आपल्या मासेमारी व्यवसायात सातत्य राखले आहे. यातून मिळणाऱ्या पैशावर त्यांची गुजराण होते.

गावरान मासे ओळखण्याचे कसब

मिलमिली नदीच्या पात्रात उतरत मासे पकडून त्या आणतात. नंतर नेर बाजारात बसून या माशांची विक्री करण्यावर त्यांचा भर आहे. संकरितऐवजी गावरान माशांना ओळखण्यात त्यांचे कसब. त्याच माशांना पकडून त्या विक्रीसाठी पानावर ठेवतात. त्यामुळे वेगळाच गंध त्यांच्या माशाला असतो. परिणामी ग्राहकांची ही मागणी राहते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com