Lake Work : गाळ न काढताच तलावाचे काम

Jal Jivan Mission : पाण्याचे स्रोत आटल्याने जलजीवन मिशन योजनादेखील बिनकामाची ठरली आहे.
Lake Work
Lake WorkAgrowon

Neral News : कर्जत तालुक्यात असलेल्या दुर्गम भागात उन्हाळ्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र होतात. पाण्याचे स्रोत आटल्याने जलजीवन मिशन योजनादेखील बिनकामाची ठरली आहे. त्यामुळे शासनाकडून पाणी अडवा पाणी जिरवा हे धोरण अवलंबले जात आहे.

Lake Work
Galmukt Dharan Yojana : ‘गाळमुक्त धरण’मध्ये सोलापूर जिल्हा राज्यात पहिला

तालुक्यातील अंभेरपाडा गावात यासाठी दोन कोटी १९ लाख रुपये खर्चून साठवण तलाव बांधला जात आहे. मात्र, हे बांधकाम होत असताना ग्रामस्थांनी केलेल्या सूचना ठेकेदाराकडून धुडकावल्या असून, तलावातील गाळ काढला गेला नसल्याने ग्रामस्थ नाराज झाले आहेत.

Lake Work
Galmukt Dharan Yojana : धरणांतील गाळ काढण्यासाठी १५ कोटींचा आराखडा

तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधवांची वस्ती आहे. उन्हाळ्यात उन्हाच्या झळांसोबत या भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईच्या झळादेखील तीव्र होतात. त्यामुळे पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करावी लागते. शासनाकडून पाणीटंचाई आराखडा कागदावर तयार होत असला तरी प्रत्यक्षात तुटपुंज्या टँकरच्या भरवश्यावर टंचाईवर मात होत नाही, हे वास्तव आहे.

या कामात खरंतर गाळ किंवा माती काढणं समाविष्ट नाही; मात्र हे काम पूर्ण झाल्यानंतर याबाबत आपण नक्कीच इतर कुठली तरतूद करून माती काढण्याचं काम करू आणि ग्रामस्थांशी उलट वागणं चुकीचं आहे. याबाबत ठेकेदाराला सूचना देण्याचं काम करू. ग्रामस्थांच्या सूचना ऐकून त्यांचं समाधान करण्याचा प्रयत्न करू.
-विलास देशमुख, उपअभियंता, मृदू व जलसंधारण उपविभाग, कर्जत
तलावाचे काम सुरू असताना साठवण भागात मोठ्या प्रमाणात माती आहे. ती काढल्यास त्यात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा होऊन पाणी मुरून जलस्रोत वाढेल, असे आम्ही ठेकेदाराला सांगितले; मात्र तो माती, गाळ काढणार नाही, या भूमिकेवर ठाम आहे.
-मारुती जोशी, ग्रामस्थ, अंभेरपाडा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com