Water Scheme Fund : नागपुरातील ४७० तलावांच्या दुरुस्तीसाठी निधीचा अभाव

Ground Water level : भुजलातील पातळीसोबतच सिंचन क्षेत्रात वाढीच्या उद्देशाने तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे केली जातात. जिल्ह्यात ४७० तलाव आहेत.
Water Scheme Fund
Water Scheme Fund Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : नागपूर ः भुजलातील पातळीसोबतच सिंचन क्षेत्रात वाढीच्या उद्देशाने तलाव व साठवणूक बंधाऱ्यांची कामे केली जातात. जिल्ह्यात ४७० तलाव आहेत. परंतु या तलावांतील गाळ काढण्यासह इतरही कामांकडे दुर्लक्ष झाल्याने सिंचन क्षमता कशी वाढणार ? असा प्रश्‍न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

जिल्ह्यात १३७ लघु सिंचन लताव, ६० पाझर तलाव, ३७ गावतलाव, ३४ मालगुजारी तलाव, २४ साठवण तलाव असे ४७० तलाव आहेत. त्यासोबतच ८८७ साठवण बंधारे, ७२८ कोल्हापुरी बंधारे आहेत. तलाव व बंधाऱ्यांची संख्या विचारात घेता जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात वाढीची अपेक्षा होती. परंतु, तलाव व बंधाऱ्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. परिणामी त्यांची साठवण क्षमता कमी झाल्याने सिंचन क्षेत्रातील अपेक्षित वाढीला ब्रेक लागला आहे. जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाकडे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी आहे. परंतु तलावातील गाळ काढण्यासाठी निधी नाही, अशा परिस्थितीत सिंचन क्षमता वाढणार कशी ? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Water Scheme Fund
Agriculture Irrigation : सांगोल्यातील पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी चार कोटींचा निधी

अतिवृष्टी काळात तलावाचे पाणी शेतात शिरल्याने नुकसान होते. या नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत मिळाली नसल्याचाही आरोप आहे. शासनाकडून प्रस्ताव पाठविले जातात. परंतु मदतीबाबत कोणताच निर्णय होत नाही, अशी स्थिती आहे.

गेल्या दोन वर्षातील पावसाळ्यात अतिवृष्टी व पुरामुळे तलावांचे नुकसान झाले. ४७० तलावांपैकी १३७ तलावांची दुरुस्ती आवश्‍यक होती. यासाठी वेळोवेळी शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली. परंतु निधी उपलब्ध झाला नाही.

दहा वर्षांपूर्वी १५० कोटींचा प्रस्ताव

तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी १५० कोटींचा निधी द्यावा, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीने दहा वर्षांपूर्वी राज्य सरकारकडे पाठविला होता. परंतु, तो प्रलंबित आहे, जिल्हा नियोजन समितीकडूनही मागणीनुसार निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे.

...असे आहेत तलाव

लघु सिंचन १३४

पाझर तलाव ६०

गाव तलाव ३९

तलाव २९४

साठवण तलाव २४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com