Hospital Facility : मोहोळमध्ये उपजिल्हा रुग्णालयात सुधिवांचा अभाव

Hospital Issue : मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही परिस्थिती ‘जैसे-थे’च आहे. रुग्णालयात पाण्याची अत्यंत अडचण असून, शवविच्छेदन केलेला मृतदेह धुण्यासाठीही पाणी विकत घ्यावे लागते.
Hospital
Hospital Agrowon

Solapur News : मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळूनही परिस्थिती ‘जैसे-थे’च आहे. रुग्णालयात पाण्याची अत्यंत अडचण असून, शवविच्छेदन केलेला मृतदेह धुण्यासाठीही पाणी विकत घ्यावे लागते. पाण्यासह या रुग्णालयात अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे. वैद्यकीय अधिकारीही नाहीत, एकाच तात्पुरत्या स्वरूपात नेमलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर ताण येत आहे. त्यामुळे हे रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे.

मोहोळ हा अपघाती परिसर म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अपघातातील जखमींवर तात्पुरत्या स्वरूपात उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवावे लागते. या रुग्णालयासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन पदे मंजूर आहेत. त्यापैकी दोन पदे भरली आहेत. परंतु दोघेही गेल्या चार महिन्यांपासून वैद्यकीय रजेवर आहेत. दररोजच्या कामकाजात अडचण येऊ नये म्हणून तात्पुरत्या स्वरूपात वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे, त्यावरच पूर्ण रुग्णालयाचा कारभार सध्या सुरू आहे.

Hospital
Hospital Vacancy : रुग्णालयांतील रिक्त पदे भरणार

या रुग्णालयात अधिपरिचारकांची सात पदे मंजूर आहेत, त्यापैकी चार रिक्त आहेत. या रुग्णालयात दररोजची ओपीडी २०० ते ३०० एवढी आहे. तर रुग्णालयात विविध आजारांच्या उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांची दररोजची संख्या ही २५ ते ३० एवढी आहे. त्यामुळे दररोजच्या कामकाजात अडचणी येत आहेत. मोहोळ शहर परिसरात अपघात झाला व त्यात एखादी व्यक्ती मरण पावली तसेच अन्य कारणाने मृत्यू झालेल्या दोन-तीन व्यक्तींचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दररोज मोहोळला येतात. मृतदेहाच्या उत्तरीय तपासणी अगोदर मृतदेह धुण्यासाठी पाण्याची व्यवस्था करावी लागते. गेल्या दोन महिन्यांपासून शहरात पाणीटंचाई असल्याने रुग्णालयालाही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

Hospital
Agriculture Department : बाळापूर तालुक्यात कृषी विभागात ५० टक्के जागा रिक्त

पाण्याच्या अडचणीबाबत नगरपरिषद व तहसील प्रशासन यांच्याकडे रुग्णालय प्रशासनाने वेळोवेळी पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे, मागणीही केली आहे; परंतु त्याची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे रुग्णालयासमोर मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत.

मोहोळ हे तालुक्याचे ठिकाण असून, परिसरात १०४ गावे आहेत. मोहोळ अपघाती परिसर म्हणूनही ओळखला जातो. मात्र, ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत कुठल्याच सुविधा नाहीत, त्यामुळे हे रुग्णालय ‘सलाईन’वर आहे. आरोग्यमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन रुग्णांना चांगल्या सोयीसुविधा त्वरित उपलब्ध करून द्याव्यात.
राजन घाडगे, सदस्य, रुग्ण कल्याण समिती, मोहोळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com