Onion Harvest Labour Shortage: कांदा काढणीत मजूरटंचाईची झळ

Agricultural Crisis: यंदा राज्यभर रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची विक्रमी वाढ झाली आहे. आता कांदा काढणी सुरू झाली असून मजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
Onion Harvesting
Onion HarvestingAgrowon
Published on
Updated on

Nashik News: यंदा राज्यभर रब्बी हंगामातील उन्हाळ कांद्याची विक्रमी वाढ झाली आहे. आता कांदा काढणी सुरू झाली असून मजूर मिळत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. यंदा मजुरीचे दर ४० टक्क्यांनी वाढल्याने शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडले तर कांदा काढणी वेळेवर होत नसल्याने कामकाज कोलमडले आहे. मजुरांची शोधाशोध करावी लागत असून कामे वेळेवर होत नसल्याने शेतकरी तणावात आहेत.

चालू हंगामात मॉन्सूनोत्तर पावसामुळे कांद्याच्या रोपवाटिका मोठ्या प्रमाणावर खराब झाल्या. दुबार रोपवाटिका तयार करून शेतकऱ्यांनी विक्रमी लागवडी केल्या. आता कांदा काढणीयोग्य झाला असताना अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व उन्हाच्या चटक्यामुळे कांद्याची पात वाळून गेली आहे. त्यामुळे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी कांदा काढणीसाठी मजुरांच्या शोधात आहेत. मात्र मजूर मिळेना, जे मिळाले ते दुपारी उन्हाच्या चटक्यात काम करण्यास तयार नाहीत, तर अधिक पैसे सांगून कामासाठी तयार होत आहेत.

Onion Harvesting
Onion Chawl: दौंडला अत्याधुनिक कांदा चाळींकडे कल

मार्चपासून टप्प्याटप्याने कांदा काढणीच्या कामांना वेग आला होता. उन्हामुळे चटका वाढला, तर पावसामुळे नुकसान झाल्याने कांदा सडण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे कांदा काढणीची लगबग आहे. मात्र मजूर टंचाईमुळे अडचणी आहेत. जेथे कामे सुरू आहेत तेथे मजुरांना अधिकचे पैसे मोजून कामे पूर्ण करून घ्यावी लागत आहेत. मध्य प्रदेश राज्यातील सेंधवा, बडवाणी तर गुजरातमधील डांग, आहवा भागातून कांदा काढणीसाठी येणारे मनुष्यबळ यंदा कमी दाखल झाले आहेत.

Onion Harvesting
Onion Market: राज्यात उन्हाळ कांद्याची आवक वाढली; बाजारात दर २१०० ते २२०० रुपये क्विंटल

...अशी आहे बिकट परिस्थिती

  • मजूर वेळेवर मिळत नसल्यामुळे कांदे शेतात काढणी अभावी खराब; खर्च करून कांद्याचे नुकसान

  • कांदा काढणीसाठी ठेका ठरवून आगाऊ पैसे दिलेले असतानाही मजुरांची कामावर दांडी

  • कुठे मजूर मिळेल का मजूर, अशी कांदा उत्पादकाकांकडून ५० ते ६० किलोमीटरच्या परिसरात चौकशी

  • काही बड्या शेतकऱ्यांचा गुजरात, मध्य प्रदेश राज्यात जाऊन मजुरांसाठी शोध

  • टोळ्यांमधील मजुरांची विभागणी झाल्याने अनेक ठिकाणी मुश्किलीने ३ ते ४ मजूर कांदा काढणीसाठी उपलब्ध

  • कामे वेळेवर पूर्ण करून घेण्यासाठी एकरी १५ हजार रुपयांपर्यंत मजुरांकडून मागणी

  • मजुरांच्या वाहतुकीसाठी वाहन व्यवस्था करून देण्याची तसेच प्रवासी भाडे देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

कांदा काढणी आणि कांदा चाळीत साठवण्यासाठी मजूर मिळेनात. सरकारी योजनांचा मोठा फटका बसतो आहे. अभूतपूर्व मजूरटंचाई आहे.
जितेंद्र निकम, कांदा उत्पादक, कळवण
कांदा काढणीचा एकरी खर्च दुपटीने वाढला आहे. यापूर्वी ७,००० रुपये एकरी मजुरी होती, आता १४ ते १५ हजार रुपये देऊनही मजूर मिळत नाहीत.
संदीप शेवाळे, कांदा उत्पादक शेतकरी, खामखेडा, ता. देवळा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com