KVK : ‘केव्हीके’ ही कृषी विस्तारतील प्रभावी यंत्रणा

Agriculture Extension : कृषी विज्ञान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. यामुळे उत्पादन वाढले आहे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे.
KVK Jalna
KVK JalnaAgrowon
Published on
Updated on

Badanapur News : कृषी विज्ञान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. यामुळे उत्पादन वाढले आहे आणि शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे. केव्हीके ही कृषी विस्तारतील प्रभावी यंत्रणा असल्याचे मत खासदार कल्याणराव काळे यांनी व्यक्त केले.

भारतामध्ये कृषी विज्ञान केंद्रांची स्थापना होऊन ५० वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांचे मार्गदर्शनानुसार २३ ते २७ सप्टेंबर २०२४ या कालावधीत ‘कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताह’ संपूर्ण भारतात साजरा करण्यात येत आहे. याचेच औचित्य साधून कृषी विज्ञान केंद्र, बदनापूर द्वारे सोमवारी (ता. २३) ड्रोन प्रात्यक्षिक आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

KVK Jalna
KVK Review : ‘केव्हीके’चा ‘आयसीएआर’कडून आढावा

या शेतकरी मेळाव्याचे उद्घाटन खासदार डॉ. काळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आर. कापसे, सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. आर. डी. अहिरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. एस. डी. सोमवंशी यांनी केले.

KVK Jalna
KVK Award : उत्कृष्ट विस्तार कार्यासाठी नागपूर ‘केव्हीके’चा गौरव

या मेळाव्यात विविध कृषी क्षेत्रांतील तंत्रज्ञानाचे प्रदर्शन, कृषी यंत्रणा, जैविक खते, कीटकनाशके, आणि नवीन पिकांची जाणीव करून देण्यात आली. याशिवाय, कृषितज्ज्ञांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रात मोसंबी पिकातील फळगळ व्यवस्थापन या विषयावर डॉ. संजय पाटील, प्रभारी अधिकारी मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूर यांनी तर हरभरा लागवड तंत्रज्ञान बाबत डॉ. दीपक पाटील, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा पैदासकार, कृषी संशोधन केंद्र बदनापूर यांनी मार्गदर्शन केले.

कृषक स्वर्ण समृद्धी सप्ताहाच्या निमित्ताने आयोजित शेतकरी मेळाव्यात जालना जिल्ह्यातील मोसंबी पिकाला भौगोलिक मानांकन मिळून देणारे प्रगतिशील शेतकरी पांडुरंग निवृत्ती डोंगरे आणि दगडी ज्वारी करिता जय किसान शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून भौगोलिक मानांकन मिळून देणारे भगवानराव म्हात्रे, कृषी भुषण प्राप्त शेतकरी रामदास बारगजे, रायसिंग सुंदर्डे, प्रगतिशील शेतकरी विठ्ठल वैद्य, अशोक सानप, बाबासाहेब मुंढे, जयकिसन शिंदे, सौ. सोनाली खाडे, सय्यद नबी सलीम, बाबासाहेब सावंत, नानासाहेब गुंडे आणि जगन्नाथराव घाडगे यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर. एल. कदम, विषय विशेषज्ञ, केव्हीके, बदनापूर यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. जी. एम. गुजर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com