Kurla Dairy Place : कुर्ला दुग्धशाळेची जागा अदानी समूहाच्या घशात

Adani Group : दुग्धविकास विभागाची कुर्ला दुग्धशाळेची २० हजार कोटी रुपये किमतीची कुर्ल्यातील साडेआठ हेक्टर जागा २५ टक्के सवलतीच्या दरात अदानी समूहाला दिली आहे.
Milk Dairy
Milk DairyAgrowon

Mumbai News : दुग्धविकास विभागाची कुर्ला दुग्धशाळेची २० हजार कोटी रुपये किमतीची कुर्ल्यातील साडेआठ हेक्टर जागा २५ टक्के सवलतीच्या दरात अदानी समूहाला दिली आहे. हे सरकार चोर आणि लुटारू आहे, असा घणाघाती आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्री या प्रकाराला पाठीशी घालत आहेत, असा गंभीर आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी विधानसभेत केली.

राज्य सरकारने दुग्ध व्यवसाय विभागातून हळूहळू बाहेर पडण्याचे ठरविले असून, भविष्यात दूध संकलन आणि वितरणाची सरकारची भूमिका नाही, असे सांगत कुर्ला येथील मातृदुग्धशाळा हा प्रकल्प बंद असल्याने या जागेची दुग्ध व्यवसाय विभागास आवश्यकता नाही. त्यामुळे ही जमीन पायाभूत प्रकल्प, बाधित लोकांचे पुनर्वसन, पीएपी सदनिकांच्या बांधकामासाठी अशा शासकीय जमिनीची प्रचलित बाजार मूल्य दर तक्त्यानुसार येणाऱ्या किमतीच्या २५ टक्के सवलतीच्या दराने देण्याचा शासन आदेश काढण्यात आला आहे.

Milk Dairy
Mother Dairy Milk : अमूल पाठोपाठ मदर डेअरीची दूध दर वाढ

ही जागा धारावी पुनर्वसन प्रकल्प प्राधिकरणास हस्तांतरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या जागेवर सध्या दुग्धशाळा, कर्मचारी वसाहत, शीतगृह, मुख्य इमारत आणि इतर बांधकाम आहे. कर्मचारी वसाहतीत सरकारच्या विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी राहत आहेत. या हस्तांतरावरून वडेट्टीवार यांनी प्रश्‍नोत्तराच्या तासानंतर पॉइंट ऑफ ऑर्डरद्वारे सरकारवर टीकेची झोड उठवली.

ते म्हणाले, की मुंबई राजरोस लुटली जात आहे. धारावी प्रकल्पात प्रथम साडेपाचशे एकर जागा दिली. त्यानंतर १२०३ एकर जागा दिली. मिठागराची एक इंच जागा दिली जाणार नाही असे भाजपचे नेते सांगत होते. या मिठागराची जागाही विकायला काढली आहे. कुर्ला दुग्धशाळेची जमीन १० जून रोजी पशुसंवर्धन विभागाकडून महसूल विभागाकडे हस्तांतर झाली. त्यानंतर त्याच दिवशी ही जमीन अदानी समूहाला हस्तांतरित झाली आहे. या हस्तांतराला विरोध केला म्हणून पशुसंवर्धन विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांची बदली करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Milk Dairy
Dairy Business : मांजरा पट्ट्यात शिंदे यांचा प्रेरणादायी दुग्ध व्यवसाय

ते पुढे म्हणाले, ‘‘कुर्ला येथील जमिनीची किंमत वीस हजार कोटी रुपये होते तरीही रेडी रेकनरच्या केवळ २५ टक्के दराने जमीन दिली गेली आहे. या जागेचे हस्तांतर कशाप्रकारे झाले याचे इतिवृत्त समोर आले पाहिजे. जमिनी घशात घालणाऱ्या चोरांची आणि लुटारू सरकारची चौकशी झाली पाहिजे. या सगळ्या प्रकाराला राज्याचे प्रमुख पाठीशी घालत आहेत. मुंबईतील सगळ्या जमिनी घशात घातल्या जात आहेत. चोरांचा, भ्रष्टाचाराचा बाजार भरला आहे. मुंबईची विक्री होत असेल तर त्यांची चौकशी केली पाहिजे,’’ अशी मागणी त्यांनी केली.

‘ग्यानबा हरी, तुकाराम घरी’

तत्कालीन सचिव तुकाराम मुंढे यांची बदली या जागा हस्तांतराला विरोध केल्यानेच झाल्याचा आरोप केला. ‘सभागृहात करता ग्यानबा हरी आणि तुकाराम घरी’ अशी अवस्था का, असा सवाल केला. ग्यानबा हरी करून राज्याची दिशाभूल करत असल्याचा आरोपही श्री. वडेट्टीवार यांनी केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com