Farmer Awards : माळेगाव यात्रेत कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण

Distribution of Awards : महाराष्ट्रासह मराठवाड्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेदरम्यान जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ८० स्टॉलमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषी प्रदर्शन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
Farmers Awards
Farmers AwardsAgrowon
Published on
Updated on

Nanded News : महाराष्ट्रासह मराठवाड्यात महत्त्वपूर्ण असणाऱ्या श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेदरम्यान जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत ८० स्टॉलमध्ये डॉ. शंकरराव चव्हाण भव्य कृषी प्रदर्शन व डॉ. शंकरराव चव्हाण कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांनी केले आहे.

Farmers Awards
Norman Borlaug Award : चंद्रशेखर भडसावळे यांचा नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने गौरव

माळेगाव येथे २९ डिसेंबर ते दोन जानेवारी या कालावधीत खंडोरायाच्या यात्रेनिमित्त कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे, मसाला पिके, भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील फळे, भाजीपाला व मसाला पिकाचे उत्कृष्ट नमुने आणून ठेवावे, प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्याच्या नमुन्यास प्रत्येक वाणातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येणार आहे.

Farmers Awards
Sugar Factory Award : भाऊसाहेब थोरात कारखान्यास राष्ट्रीय को-जनरेशन पुरस्कार

विजेत्या शेतकऱ्यांना चार हजार, तीन हजार व दोन हजार बक्षीस देण्यात येणार आहे. यासाठी ८० स्टॉल्सचे नियोजन केले आहे. यामध्ये बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, औषधे, ट्रॅक्टर निर्माण, अवजारे उत्पादन तसेच महिला बचतगटाचे आरोग्य विभागाचे, कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, महाबीज, खादीग्रामोद्योग अशा विविध स्टॉल्सचा समावेश असेल, अशी माहिती कृषी अधिकारी पुंडलिक माने यांनी दिली.

कृषी प्रदर्शनाचे आकर्षण

माळेगाव यात्रेत भरणाऱ्या कृषी प्रदर्शनाचे दरवर्षी शेतकऱ्यांना आकर्षण असते. यात विविध प्रकारचे फळे, भाजीपाला, शेतीमाल प्रदर्शन व विक्रीसाठी ठेवला जातो. विविध शेती उपयोगी अवजारे पाहण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होते. यासोबतच शासकीय कृषी कार्यालयाकडून माहिती पत्रके देण्यात येतात. यासाठी शेतकरी दिवसभर या स्टॉलना भेटी देतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com