Krishna River : कृष्णा नदीवर पुन्हा सोमवारपर्यंत उपसाबंदी

Koyna Dam : कोयना आणि वारणा धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे.
Krishna River
Krishna RiverAgrowon

Sangli News : कोयना आणि वारणा धरणातील पाणीसाठा कमी झालेला आहे. अद्याप पावसाला सुरुवात न झाल्याने पावसाळ्यापर्यंत उपलब्ध पाणी पुरवणे अत्यावश्यक आहे. या पार्श्‍वभूमीवर कृष्णा नदीमधून शेतीसाठी खासगी उपसा करणाऱ्या सर्व योजनांवर पुन्हा बंदी आदेश पाटबंधारे विभागामार्फत लागू करण्यात आला.

त्यानुसार २३ ते २६ जून या कालावधीत उपसाबंदी राहील. तर २७ ते ३० जून या कालावधीत उपसा करता येईल. पिण्याच्या पाणीपुरवठा योजना सुरू राहतील.

Krishna River
Ujani Dam : उजनीच्या पोटातलं प्राचीन शिल्पकलेचं गुपीत उघडं पडलं

जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाला सुरुवात झालेली नाही. दिवसेंदिवस धरणातील पाणी कमी होत असल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची भीती आहे. सध्या कोयना धरणात १०.८२ टीएमसी, तर वारणामध्ये १०.७० टीएमसी पाणीसाठा आहे.

तो कमी असल्यामुळे त्याचा वापर काटकसरीने करणे गरजेचे आहे. मागील आठवड्यात १४ ते १७ जूनपर्यंत नदीवर उपसा बंदी लागू होती. अद्याप पाऊस न झाल्याने पुन्हा बंदीचा निर्णय घेण्यात आला.

पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येईल. उपसाबंदी कालावधीमध्ये पिण्याच्या पाणीपुरवठ्या व्यतिरिक्त इतर कारणासाठी (खासगी) कृष्णा नदीतून पाणीउपसा केल्यास हा उपसा अनधिकृत समजून संबंधितांचा पाणी परवाना व वीजपुरवठा एक वर्षाच्या कालावधीकरिता रद्दबातल करण्यात येईल.

याची नोंद घेऊन उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर नदीवरील लाभक्षेत्रातील उभी पिके जोपासण्यासाठी आधुनिक सूक्ष्म सिंचनाचा वापर करून फक्त पिकांचे नुकसान होऊ नये या दृष्टीने नियोजन करून विभागास सहकार्य करावे. असे आवाहन सांगली पाटबंधारेच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com