Ujani Dam : उजनीच्या पोटातलं प्राचीन शिल्पकलेचं गुपीत उघडं पडलं

Team Agrowon

उजनी धरण

महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेलं उजनी धरण. या धरणाचे बांधकाम १९६९ ते १९८० या काळात या धरणाची निर्मिती करण्यात आली.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

उजनी धरणाची निर्मीती

पुणे आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर उजनी धरण बांधण्यात आलं आहे. या धरणामुळे गावच्या गावं पाण्याखाली गेली.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

प्राचीन पळसनाथ मंदिर

धरणाच्या निर्मीतीमुळे इंदापुरजवळील पळसदेव गावातील प्राचीन पळसनाथाचं मंदिर १९७५ साली उजनीच्या पोटात गुडूप झालं.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

शिल्पकलेचा उत्तम नमुना

प्राचीन शिल्पकलेचा नमुना असलेलं पळसनाथ मंदिर इ.स. १९५७ ला निर्माण झाल्याचा उल्लेख शिलालेखांवर आढळतो.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

चालुक्यकालीन मंदिर

अभ्यासकांच्या दाव्यानुसार हे मंदिर चालुक्यकालीन असावे. फलटणच्या राजे निंबाळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख मिळतो.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

मंदिर पाण्याखाली

चालुक्यकाळातील काही शतकांपूर्वी बांधण्यात आलेलं हे मंदिर पाण्याखाली असूनही आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

हेमाडपंथी मंदिर

हेमाडपंती बांधणीतील सभामंडप, सप्तभूमीज पद्धतीचे शिखर, कोरीव छत, गर्भगृह, अशा स्वरूपातील हे मंदिर शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

शिळांवरील कोरीव नक्षीकाम

१००० हजार वर्षापूर्वीचं उजनीच्या पोटात गडूप झालेलं मंदिरातील दगडी शिळांवरील सुबक कोरीव नक्षीकाम पाहताना मन मोहून जातं.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

पळसनाथ मंदिर पाण्याखाली

मंदिर बुडाल्यानंतर २००१ साली पहिल्यांदाच उघडे पडले होते. त्यानंतर बारा वर्षांनंतर ते पाहायला मिळाले.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

जलसमाधी

उजनी धरणाच्या जलसाठय़ात १९७८ मध्ये या मंदिराला जलसमाधी मिळाली. त्यानंतर पळसदेव येथे नव्या गावठाणात श्री. पळसनाथाचे नवे मंदिर उभारण्यात आले.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute

मूळ मंदिरातील शिवलिंग

मूळ मंदिरातील शिवलिंग व देवळातील नंदीची स्थापना नव्या मंदिरात केली. आजही प्राचीन काळापासून चैत्र पौर्णिमा व महाशिवरात्रीस भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात.

Palasnath Temple | Hruturaj Kalkute
Radhanagri Dam | Agrowon