Farmer Cup Competition : सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सिंदखेड गावाला बक्षीस

पुण्यातील बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान व किरण राव, राज्याचे सचिव एकनाथ डवले, सह्याद्रीचे संचालक विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण झाले.
Paani Foundation
Paani FoundationAgrowon

Farmer Cup Competition बुलडाणा : जिल्ह्यातील सिंदखेड (ता. मोताळा) या गावाने सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत (Farmer Cup Competition) बक्षीस पटकावले. सिंदखेड येथील स्त्री शक्ती महिला शेतकरी गटाने (Women Farmer Group) तालुकास्तरावर प्रथम येण्याचा मान पटकावला.

याशिवाय तालुक्यातील उबाळखेड येथील जय किसान शेतकरी गट द्वितीय, जनुना येथील एकता कापूस उत्पादक शेतकरी गट तृतीय ठरला.

Paani Foundation
Farmer Loan Waive Scheme : कर्जमाफीतील ‘ओटीएस’योजनेसाठी नव्याने प्रस्ताव

पुण्यातील बालेवाडी येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अमीर खान व किरण राव, राज्याचे सचिव एकनाथ डवले, सह्याद्रीचे संचालक विलास शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण झाले.

शेतकरी गटांमध्ये शाश्वत शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा सुरू करण्यात आली आहे.

Paani Foundation
Farmer Cup Competition : भूजल विभागाचा पानी फाउंडेशनसोबत करार

सिंदखेड येथील स्त्रीशक्ती महिला शेतकरी गटाने तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार पटकावला. शेतकरी गटात रंजना राजेंद्र गडाख, जया रामधन शेळके, आशा पुंडलिक सूरोसे, उषा पद्माकर आलोने, चंदा सतीश लवकर, उषा सुभाष मोरे, लता रमेश गडाख, सुभद्रा रघुनाथ आवटे, रेखा श्रीकृष्ण थाटे, शारदा जयवंता नरवाडे, शोभा विठ्ठल सुरोशे, निर्मला सुधाकर कापसे, जिजाबाई अशोक गडाख, सविता अरुण पवार, सिंधू ज्ञानदेव गडाख, सुनीता शरद गडाख, संतोषी रामदास गवळी, अलका भागवत शिंदे यांचा समावेश आहे.

या महिलांनी स्पर्धेअंतर्गत विविध प्रकारची कामे केली. त्याची दखल घेत हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या महिलांना सिंदखेड ग्रामपंचायतीनेही प्रोत्साहन दिले. त्यामुळे यावर्षी राज्यस्तरावरील बक्षीस घेऊ असे मत सरपंच प्रवीण (अप्पा) कदम यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com