Krishak Awards : ‘कृषक’च्या पुरस्कारांचे शुक्रवारी वितरण

Awards Distribution : भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा १२६ वा जयंती उत्सव सोहळा शुक्रवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र येथे होणार आहे.
Krishak Awards
Krishak AwardsAgrowon
Published on
Updated on

Pune News : भारताचे पहिले कृषी राज्यमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा १२६ वा जयंती उत्सव सोहळा शुक्रवारी (ता. २७) सकाळी ११ वाजता नारायणगाव कृषी विज्ञान केंद्र येथे होणार आहे.

Krishak Awards
Norman Borlaug Award : चंद्रशेखर भडसावळे यांचा नॉर्मन बोरलॉग पुरस्काराने गौरव

त्यानिमित्त ‘भारतीय कृषक समाज’च्या वतीने शेतकरी मेळावा तसेच कृषी व उद्योगक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्काराचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती भारतीय कृषक समाजचे राज्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष नलांगे यांनी दिली.

Krishak Awards
Sugar Factory Award : भाऊसाहेब थोरात कारखान्यास राष्ट्रीय को-जनरेशन पुरस्कार

डॉ. पंजाबराव देशमुख जयंती सोहळ्यासाठी भारतीय कृषक समाज राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. कृष्णबीर चौधरी, राज्याचे प्रभारी ज्योती सुरसे, राज्याचे अध्यक्ष डॉ. सुभाष नलांगे, महिलाध्यक्षा स्वाती बोरीकर, गिन्नी अॅग्रो प्रा. लि.चे संचालक मनोज मंत्री, बेळगावचे भारतीय कृषक समाजचे राष्ट्रीय उपाध्यक्ष लिंगराज पाटील, कृषिरत्न अनिल मेहेर, कृषिरत्न, प्रगतिशील शेतकरी डॉ. प्रकाश सिंह रघुवंशी आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

या वेळी डॉ. पंजाबराव देशमुख जलरत्न पुरस्कार डॉ. चंद्रकांत भोयर यांना, कृषिरत्न पुरस्कार आकाशचंद्र गौरठाकूर, केशवराव देशमुख, मनीषा पोटे, यज्ञेश सावे यांना, कृषिभूषण पुरस्कार बाळासाहेब बाबासाहेब पाटील, विजय मुळे, दत्तात्रय घाडगे, प्रा. रंगनाथ भापकर, मनोज जंवजाळ यांना तर उद्योगभूषण पुरस्कार सपना तायडे, राधिका घाटगे, अनुराधा काशीद, रूपाली गायकवाड, संतोष गादे यांना देण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com