

Sangli News : राज्यातील अनेक धरणांमध्ये पाणीसाठी कमी झाल्याने अनेक जिल्ह्यात पाटबंधारे विभागाने उपसाबंदी लागू केली आहे. दरम्यान राज्यातील महत्वारी असणारी नदीही कोरडी पडल्याने सांगली जिल्ह्यात शेतीसाठी खासगी पंप चालकांवर उपसाबंद लागू करण्यात आली आहे.
दरम्यान सांगली जिल्ह्याला पाणी देणाऱ्या कोयना आणि चांदोली धरणात अत्यल्प पाणीसाठी शिल्लक राहिल्याने शासनाने ही पावले उचलली आहेत.
सांगली जिल्ह्यात गावांना फक्त पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे. सांगली पाटबंधारे विभागाने आजपासून (१४ जून) उपसाबंदी आदेश लागू होणार असून तो १७ जूनपर्यंत कायम ठेवण्यात आलाय.
यानंतर पुढचे तीन दिवस १८ ते २० जून यादरम्यान शेतीसाठी उपसा करता येणार आहे. तसेच पर्जन्यमानानुसार व परिस्थितीनुसार पुढील नियोजन करण्यात येणार असल्याचे पत्र पाटबंधारे विभागाने जारी केले आहे.
पिण्याचा पाणीपुरवठा सोडून इतर कारणांसाठी कृष्णा नदीतून उपसा केल्यास संबंधितांचा पाणी परवाना व विद्युत पुरवठा एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्याचे आदेश लागू केले आहेत.
तसेच सामग्री जप्त करून पुढील कारवाई करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही पाटबंधारे विभागाच्या आदेशात म्हटले आहे. ताकारी योजना आजपासून बंद करण्यात आली आहे, तर केवळ टेंभू आणि म्हैशाळ अंशतः सुरू असणार आहे.
कोयना धरणातही पाणीबाणी...
कोयना धरणातून पिण्याच्या पाण्यासाठी एक टीएमसी पाण्याचा वापर केला जात आहे. यामुळे जोपर्यंत मॉन्सून बरसत नाही तोपर्यंत कोयनेच्या अखत्यारित असलेल्या गावांना पाण्याची समस्या भेडसावण्याची शक्यता आहे. याचबरोबर पाऊस लांबल्यास कोयना धरणामध्ये केवळ दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे कोयनेतील पाण्याचे जपूनच नियोजन करावे लागणार आहे.
कोयना धरणातून विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या १ हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. त्याचा थेट परिणाम सांगली-मिरज शहरावर होत आहे. त्यामुळे सांगली महापालिकेकडूनही पाण्याचे नियोजन सुरु आहे. संपूर्ण जून महिन्यात पाणी अत्यंत जपून वापरण्याचे पाटबंधारे विभागाचे धोरण आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.