Koyna Dam : कोयनासह जिल्ह्यातील पाच धरणातून विसर्ग

Heavy Rain Update : जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. दुपारपर्यंत पावसाच्या अधूनमधून पावसाच्या दमदार सरी येत होत्या.
Koyna Dam
Koyna DamAgrowon
Published on
Updated on

Satara News : जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे कोयना धरणासह पाच धरणातून पाण्याचा विसर्गात वाढ करण्यात आली आहे. कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फुटाने उचलून १६,५६५ क्युसेक विसर्ग सुरू कऱण्यात आला आहे. या धरणातच्या पायथा व दरवाज्यातून एकूण १८,६६५ क्युसेक विसर्ग नदी पात्रात केल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू असून शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे. दुपारपर्यंत पावसाच्या अधूनमधून पावसाच्या दमदार सरी येत होत्या. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्याने पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे पाच धरणातून विसर्गात वाढ केली आहे. कोयना धरण क्षेत्रातील कोयना १३३, नवजा १८८, महाबळेश्वर २२६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Koyna Dam
Sangli Rain : सांगली जिल्ह्यात ९१ मिमी पाऊस

धरणात प्रतिसेकंद ४२,५८८ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. पाणीसाठा नियंत्रित राहण्यासाठी सहा वक्र दरवाजे चार फुटाने उचलून १६,५६५ क्युसेक व विसर्ग सुरू केला आहे. त्यानंतर पाच वाजता चार फुटांवरून दरवाजे पाच फुटावर उचलून २०,९०० क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पायथा वीज गृहातून २१०० व दरवाज्यातून २०,९०० असा एकूण २३,००० क्युसेक विसर्ग नदी पात्रात केला आहे.

Koyna Dam
Maharashtra Rain: राज्यात पावसाचा जोर वाढला

कोयना धरणात सांयकाळी पाच पर्यंत ८३.०५ टीएमसी (७८.९१ टक्के) पाणीसाठा झाला आहे. धोम धरणातूनही सकाळी ११ वाजता २००० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. तारळी धरणातून विसर्गात वाढ करत ६८०० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात केला जात आहे. धोम-बलकवडी धरणातून सकाळी आठ वाजता ११२७ क्युसके विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

कण्हेर धरणातून सकाळी दहा वाजता २००० क्युसेक विसर्ग सुरू केल्याने सध्या या धरणातून २७०० क्युसेक विसर्ग वेण्णा नदीपात्रात केला जात आहे. जिल्ह्यातील सहा प्रमुख धरणांपैकी पाच धरणातून विसर्ग सुरू झाल्याने नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोयना धरणाचा अपवाद वगळता इतर सर्व धरणात ८० टक्केवर पाणीसाठा झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com