Crop Damage
Crop Damage Agrowon

Unseasonal Rain : कापलेला शाळू भिजला; उभे पीकही जमीनदोस्त

Heavy Rain Crop Loss : पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र झालेला पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह आल्याने पाऊस पडून देखील पिकाचे नुकसान झाले आहे.
Published on

Kolhapur News : जिल्ह्याला मंगळवारी (ता.२३) सायंकाळी वळीव पावसाने झोडपून काढले. बहुतांशी तालुक्यात जोरदार सोसायटीच्या वाऱ्यामुळे उसासह अन्य उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने मोठे नुकसान झाले.

सोसाट्याच्या वाऱ्यासह पडलेल्या वळीव पावसाने शाळू पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापून ठेवलेला शाळू भिजल्याने धान्य काळवंडण्याचा धोका निर्माण झाला आहे. तर कापणी योग्य शाळू सोसाट्याच्या वाऱ्याने जमीनदोस्त झाल्याने या पिकाचेही नुकसान होणार आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

Crop Damage
Unseasonal Rain: सांगलीत अवेळी पावसामुळे दोनशे हेक्टरवरील पिकांचे नुकसान

गेल्या महिन्याभरापासून चकवा देणाऱ्या पावसाने मंगळवारी जोरदार हजेरी लावली. ढगांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह कोसळलेल्या पावसाने शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मुळात पाऊस नसल्याने पिके धोक्यात आली होती. विहिरीने तळ गाठल्याने व शेतीला भेगा पडल्याने पाण्याची नितांत गरज भासत होती.

Crop Damage
Unseasonal Rain : सोलापूर जिल्ह्यात १४८ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका

पाण्याअभावी पिकांचे नुकसान होण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र झालेला पाऊस सोसाट्याच्या वाऱ्यासह आल्याने पाऊस पडून देखील पिकाचे नुकसान झाले आहे. शिरोळ तालुक्यात अनेक शेतकऱ्यांनी शाळू पिकाची कापणी केली आहे.

खुडणी करण्याआधीच सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडल्याने काढलेला शाळू पूर्णपणे भिजला आहे. भिजलेला शाळू काळवंडण्याचा धोका आहे. आठवड्याभरात कापणीला आलेला शाळूदेखील वाऱ्याने जमीनदोस्त झाला आहे.

परिणामी, या पिकाचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पाण्याअभावी धोक्यात असणारी पिके पावसानंतरही धोक्यात आली आहेत. तापमानाचा पारा ४० अंशांवर पोहोचून देखील एक ही वळीव पाऊस न झाल्याने पिके संकट होती.

विहिरी, कुपनलिकाचे पाणी तळाला गेले होते. अशा स्थितीत वळवाच्या पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागून राहिली होती. पाऊस झाला तरच पिकांना वाचवणे शक्य होते. मात्र मंगळवारच्या सोसाट्याच्या वाऱ्याने पिके हातची गेल्याची भावना शेतकऱ्यांची निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com