
Kolhapur ZP Agriculture News : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध योजना राबवल्या जातात. यामध्ये कृषी विभागाकडून स्वनिधी योजना अंतिम करण्यात आल्या आहेत. या नऊ योजनांचे अर्ज पुढील आठवड्यापासून शेतकऱ्यांना पंचायत समितीमध्ये उपलब्ध होणार आहेत. काही योजनांमध्ये बदल झाल्याने या योजना जाहीर करण्यास विलंब झाल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून देण्यात आली आहे.
यापूर्वी कृषी विभागामार्फत भाजीपाला बियाणे, मूग, उडीद बियाणे, हिरवळीचे खत, नाचणी बियाणे, जैविक, अजैविक औषधे असा १८ लाख रुपयांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात आला.
मागच्यावर्षीच्या काही योजनांमध्ये झालेले बदल, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली व नवनियुक्ती यामुळे नव्या योजना, त्याचा निधी अंतिम होण्यास विलंब झाला तरी मार्चपर्यंत या सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिक्षकांनी दिली.
यामध्ये योजना, तरतूद आणि लाभार्थी माहिती - इलेक्ट्रिक मोटर - २३ लाख, २३०, पाचटकुट्टी मशीन - २० लाख, ४०, पीव्हीसी, एसडीपी पाइप - १० लाख १००, स्लरी युनिट - ५ लाख ४१, बायोगॅस बांधकामपूरक अर्थसाहाय्य - २० लाख, अंशमुक्त कीटकनाशके - १० लाख, व्हर्मी कंपोस्ट बेड - ५ लाख, सायकल कोळपा पुरवणे - ५ लाख, जीवामृत प्लस तयार करणे ६ लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२३-२४ मध्ये जिल्हा परिषद स्वनिधी अंतर्गत ५० टक्के अनुदानावर कडबाकुट्टी मशिन पुरविणे व ७५ टक्के अनुदानावर शेळी गट वाटप या वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. योजनेचे अर्ज पंचायत समिती स्तरावर दिनांक १६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत स्विकारण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रमोद बाबर यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील १०० पशुपालकांना १० हजार रुपयांच्या मर्यादेत ५० टक्के अनुदानावर २ एच पी कडबाकुट्टी मशिन वाटप करण्यात येणार आहे. या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी पशुपालकाकडे किमान ५ जनावरे असणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील ७२ विधवा, परितक्त्या, दारिद्रय रेषेखालील महिलांना १३ हजार ८०५ रुपयांच्या मर्यादेत ७५ टक्के अनुदानावर २ शेळींचा गट वाटप करण्यात येणार आहे. पात्र व गरजू लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बाबर यांनी केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.