Kolhapur Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीच्या महापुराचे पाणी दुष्काळी भागात, ४ हजार कोटींचा निधी मंजूर

Water Drought Areas : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराचे पाणी नियंत्रण करण्याबरोबरच ते इतर दुष्काळग्रस्त भागात वळवण्याच्या राज्य शासनाच्या निर्णय झाला आहे.
Kolhapur Sangli  Flood
Kolhapur Sangli Floodagrowon

Maharashtra Government : कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराचे पाणी नियंत्रण करण्याबरोबरच ते इतर दुष्काळग्रस्त भागात वळवण्याच्या राज्य शासनाच्या महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रकल्पास जागतिक बँकेने पहिल्या टप्प्यात चार हजार कोटींचा निधी मंजूर केला आहे. मंगळवारी (ता.१३) मुंबईत 'मित्रा'च्या कार्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक होणार असल्याची माहिती 'मित्रा'चे उपाध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बैठकीनंतर १४ व १५ तारखेला पाहणीसाठी समिती येणार आहे. त्यानंतर जास्तीत जास्त सहा महिन्यांत कामाला सुरुवात होईल. २०२५ मध्ये पुराचे पाणी वळवण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.

क्षीरसागर म्हणाले, 'जिल्ह्याला चारवेळा महापुराचा मोठा फटका बसला. पातळी प्रत्येकवेळी वाढत गेली, कोल्हापूर, इचलकरंजी शहरांसह करवीर, हातकणंगले, शिरोळ तालुक्यांतील अनेक गावांना विळखा पडतो. महापूर नियंत्रणाबाबत महाराष्ट्र क्लायमेट रिझीलिन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गत आराखडा जलसंपदा विभागामार्फत करण्यात आला आहे. त्यात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील महापुराचे नियंत्रण, पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणे, असे दोन टप्पे आहेत.

पहिल्या टप्प्याच्या चार हजार कोटींच्या निधीस जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. यात पूर नियंत्रणाची कामे, उड्डाणपूल, भूस्खलन उपाययोजना, वीजवाहक तारा स्थलांतरण, ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसास्थळांचे संरक्षण, पुराची पूर्वकल्पना देणारी यंत्रणा, आपत्ती व्यवस्थापन उपकरणे, पूरसंरक्षक उपाययोजना आदी कामे होतील.

Kolhapur Sangli  Flood
Godhdi Kala Kolhapur : संस्कृतीसोबत स्टार्टअप, स्मिता ताईंनी दिली गोधडी कलेस उर्जितावस्था

जागतिक बँकेचा ७० टक्के हिस्सा असून, ३० टक्के राज्य शासनाचा आहे.' दुसऱ्या टप्प्यात महापुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे क्षीरसागर म्हणाले, तसेच पंपातून उपसा केलेले पाणी संबंधित भागात पाईपलाईनद्वारे नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या धेंडांना मी नको

क्षीरसागर म्हणाले, 'माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातील कार्यकर्त्याकडून नागरिकांची सेवा व्हावी, हे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या मोठ्या धेंडांना नको आहे. मी जनतेसाठी, तर ते कॉलेज, हॉस्पिटलसाठी काम करतात. माझ्याशी कॉंग्रेसप्रणित युद्ध सुरू आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना त्यांचीच फूस असल्याने ते प्रथम अजिंक्यतारावर गेले. 'उबाठा'मध्ये असलेल्या बांडगुळांनी स्टंट केला. आता त्यांच्या संभाजीनगरमध्ये जाऊन त्यांची वळवळ बंद करणार आहे.'

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com