Sugarcane Industries Problems : साखर उद्योगातील समस्येवर मुख्यमंत्री चर्चा करणार, शिष्टमंडळाला आश्वासन

CM Ekanth Shinde : साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर शिष्टमंडळाबरोबर चर्चेचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.
Sugarcane Industries Problems
Sugarcane Industries Problemsagrowon

Sugarcane Problems : साखर उद्योगाबाबत अनेक चांगले धोरणात्मक निर्णय घेऊन कारखानदारी टिकवण्याचा प्रयत्न केला आहे. देशातील इंधनावर होणाऱ्या परकीय चलनामध्ये बचत करण्यासाठी तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी म्हणून इथेनॉल निर्मितीला केंद्र सरकारने प्रोत्साहन दिले आहे. साखर उद्योगातील समस्या सोडवण्यासाठी निवडणुकीनंतर शिष्टमंडळाबरोबर चर्चेचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्री गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक माधवराव घाटगे यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी भेट देऊन साखर उद्योग संदर्भात सविस्तर चर्चा केली. पाऊणतास त्यांनी साखर उद्योगातील विविध धोरणांवर चर्चा केली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केंद्र सरकार व राज्य सरकारने महाराष्ट्रातील साखर उद्योगाला पाठबळ देण्याचे काम केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने साखर उद्योगाला भरावा लागणारा दहा हजार कोटी रुपयांचा आयकर माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेऊन साखर कारखानदारीला स्थिरता देण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी गुरुदत्त शुगर्स व घाटगे परिवाराच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन मुख्यमंत्री शिंदे यांचे स्वागत अध्यक्ष माधवराव घाटगे व एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे यांनी केले. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार धैर्यशील माने, महादेव घुमे, प्रसन्न घुमे, ऑकार निकम, प्रसाद पाटील आदी उपस्थित होते.

Sugarcane Industries Problems
Kolhapur Drought Condition : कोल्हापुरातील पूर्व भागातील नद्यांवर १२ दिवस उपसाबंदी, पिके वाळण्याची शक्यता

मुख्यमंत्री शिंदेनी कोल्हापुरात ठोकला तंबू

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या ८ दिवसांत तिसऱ्यांदा कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगले लोकसभेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जोडण्या लावण्याचे काम सुरू आहे. दरम्यान धैर्यशील माने यांच्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि आमदार प्रकाश आवाडे यांची भेट घेत अनेक राजकीय विषयावर चर्चा केली. दरम्यान साखर उद्योगाला उभारी देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com