Kolhapur Vegetables Market : पालेभाजी उत्पादक शेतकऱ्यांचे बजेट कोलमडलं, टोमॅटोची लाली कायम

Leafy Vegetable Price : मेथी, शेपू, कांदापात, पालक भाज्यांचे दर दहा रुपयाला तीन आणि दोन पेंड्या असे कमी झाले आहेत.
Kolhapur Vegetables Market
Kolhapur Vegetables Marketagrowon
Published on
Updated on

Vegetable Tomato Price : कोल्हापूर आणि कर्नाटक सीमा भागात संततधार पाऊस होत असल्याने आठवडी बाजारासह घाऊक विक्रेत्यांमध्ये पालेभाज्यांची आवक वाढली आहे. मेथी, शेपू, कांदापात, पालकचे दर मागील काही दिवसांपूर्वी वीस ते तीस रुपये पेंडी असे होते. आता मात्र याच भाज्यांचे दर दहा रुपयाला तीन आणि दोन पेंड्या असे कमी झाले आहेत.

दर कमी असूनही म्हणावा तसा मालाला उठाव नाही. त्यामुळे आजच्या आठवडा बाजारात अनेक भाजी व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्‍या पालेभाज्या परत न नेता तेथेच टाकून जाणे पसंत केले. अनेकांनी तर खरेदीसाठी घातलेले पैसेही न निघाल्याची सल बोलून दाखविली.

फळभाज्यांचेही दर आवक्यात आले आहेत. फळांचीही आवक वाढू लागली आहे. विशेषतः ड्रॅगनफ्रुट, वॉशिंग्‍टन, तुर्की, इराणी सफरचंदासह डाळिंब, संत्री, सीताफळ, तोतापुरीची आवक वाढली आहे. दरही तेजीत आहेत. एकूणच पावसाने आज आठवडा बाजारावर मोठा परिणाम केल्याचे चित्र होते.

पालेभाज्यांचे दर

कोथिंबीर १० रु. दोन पेंढ्या, मेथी १० रु. दोन पेंढ्या, कांदापात १० रु. पेंढी, पोकळा १५ रु. पेंढी, पालक १० रु. पेंढी, शेपू १० रु. पेंढी, अंबाडा १० रु. दोन पेंढ्या, चाकवत १० रु. पेंढी

Kolhapur Vegetables Market
Kolhapur Shivaji University : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात संततधार, शिवाजी विद्यापीठाने पेपर ढकलले पुढे

फळभाज्यांचे दर (प्रतिकिलो रुपये)

कारली १००, टोमॅटो ८० ते १००, बीनीस १८०, गवार १००, काटेरी काकडी ४०, फ्लॉवर २० ते २५ रु. नग, लिंबू १० रु. ६ नग, बीट १० रु. नग, कोबी १० रु. नग, दुधी भोपळा १० ते २० रु. नग, भोपळा फोड २० रु. नग, दोडका ६० ते ८०, वांगी १००, ढबू मिरची ६० ते ८०, भेंडी ६० ते ८०, वरणा ६० ते ८०, हिरवी मिरची ८० ते १००, शेवगा शेंग १० ते २० रु. तीन नग, गाजर ६० ते ८०

फळांचे दर (प्रतिकिलो रुपये)

सफरचंद (वाशिंग्टन, इराणी) १०० ते ३००, संत्री १०० ते १५०, मोसंबी ८० ते १२०, सीताफळ ८० ते १००, तोतापूरी आंबा ३० ते ५० रु. नग, ड्रॅगन फ्रुट १४०, केळी २० ते ७० रु. डझन.

कांदा - ३५ रु. किलो, बटाटा (इंदोरी) ४० ते ५० रु. किलो, लसूण १६० ते २०० रु. किलो, टोमॅटो ८० ते १०० रु. किलो

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com