Soybean Farmers : कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास व्यापाऱ्यांवर गुन्हा, कोल्हापूर बाजार समितीकडून इशारा

Central Government Soybean Rate : केंद्र सरकारकडून सोयाबीनच्या हमीभावात प्रतिक्विंटल २९२ रुपयांची वाढ केली. गेल्या दोन-तीन वर्षांपासून सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झालीय.
Soybean Farmers
Soybean Farmersagrowon
Published on
Updated on

Minimum Base Price Soybean : सोयाबीनसाठी किमान आधारभूत किंमत ठरवून दिलेली आहे. ठरवून देण्यात आलेल्या किमतीपेक्षा कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास संबंधित व्यापाऱ्यावर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील यांनी दिला. याबाबत सचिवांनी बाजार समिती कार्यक्षेत्रातील खरेदीदार व्यापाऱ्यांना सूचनापत्र सोमवारी (ता.०७) दिले असून दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे.

सूचनापत्रात दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाने सोयाबीन हमीभावाने करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाने समर्थन मूल्य योजनेंतर्गत घेतला आहे. व्यापाऱ्यांनी बाजार समितीचे लायसेन्स घेऊन खरेदी विक्री करावी. परस्पर व्यवहार करू नयेत तसेच यावर्षीचा सोयाबीन हमीभाव ४ हजार ८९० निश्चित केलेला आहे; मात्र शासनाने निश्चित केलेल्या हमीभावापेक्षा कमी दराने सोयाबीन विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊ नये. अन्यथा कठोर कारवाई करू. कमी दराने सोयाबीन खरेदी केल्यास पणन कायदा ३४ आणि '९४ ड' यानुसार गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा बाजार समितीच्या सचिव जितेंद्र शिंदे यांनी दिला.

Soybean Farmers
NDDB Dairy Services Kolhapur : परराज्यातील म्हशी मिळणार कोल्हापुरात, 'एनडीडीबी' डेअरी सर्व्हिसेसचा पुढाकार

शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकण्याची वेळ

सध्या सोयाबीन आवकेचा हंगाम सुरू झाला आहे पंरतु राज्यात सोयाबीनचे हमीभाव कमी असल्याने शेतकरी अस्वस्थ आहे. अशातच कोल्हापूर जिल्ह्यात सोयाबीन पीक चांगले आले असून दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार ८९२ रुपये हमीभाव जाहीर केला.

परंतु खुल्या बाजारात सरासरी ४ हजार ते ४ हजार २५० रुपयांनी विक्री होत आहे. केंद्र सरकारने हमीभाव जाहीर केला आहे परंतु राज्यात कमी भावाने सोयाबीनची विक्री होत आहे. राज्य शासनाने अद्यापही हमीभाव केंद्रे सुरू केली नसल्याने शेतकऱ्यांना कमी दरात सोयाबीन विकण्याची वेळ येत आहे.

दुबार पीक म्हणून सोयाबीन

यंदा पाऊस चांगला झाल्याने माळ रानावरही सोयाबीन पीक चांगले आले आहे. जिल्ह्यात सोयाबीन क्षेत्र सुमारे ४० हजार हेक्टरवर आहे. आडसाली लावणीमध्ये सरीवर सोयाबीन पीक येत असल्याने तेवढाच हातभार म्हणून कमी कालावधीत चांगले पैसे मिळवून देणारे नगदी पीक म्हणून शेतकरी याकडे पाहत असतो.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com