Gokul Dudh Sangh : गोकुळची दुग्ध उत्पादने थेट परदेशात, पूर्व युरोपच्या अझरबैजान देशाला बटर पुरवठा

Gokul Dudh Sangh : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) चे गाय दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार आहे.
Gokul Dudh Sangh
Gokul Dudh Sanghagrowon
Published on
Updated on

Kolhapur Jilha Dudh Sangh : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाचे (गोकुळ) गाय दुधाचे देशी लोणी (बटर) पूर्व युरोप व पश्चिम आशिया सीमेवरील अझरबैजान या देशातील अटेना दूध संघास निर्यात करण्यात येणार आहे. गोकुळकडून परदेशात पहिलीच थेट निर्यात होणार आहे. गुरूवारी (ता.०३) घटस्थापनेच्या मुहूर्तावर ४२ मे. टनाचे वातानुकूलित कंटेनर अझरबैजान देशाला पाठविण्‍यात आले. संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांचे हस्‍ते व संचालक मंडळ यांच्‍या उपस्थितीत गोकुळच्या कार्यालयातून हे ट्रक रवाना झाले.

गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले की, गोकुळ ब्रॅण्‍डची उत्‍पादने नेहमीच गुणवत्तापूर्ण असल्‍याने गोकुळला मानाचे स्‍थान निर्माण झाले आहे. संघामार्फत वेगवेगळे दुग्ध पदार्थ मार्केटमध्ये विक्री केले जातात, दुग्ध पदार्थांची विक्री वाढवण्याच्या दृष्टीने व अतिरिक्त गाय दुधाची निर्गत होणेसाठी गाय दुधाचे पदार्थ निर्यात करणे बाबत संघामार्फत प्रयत्न सुरू आहेत.

अझरबैजान या देशांमधील अटेना डेअरी यांनी संघाचे गाय देशी लोणी (बटर) खरेदी केली असून ४२ मे. टनाचे कंटेनर पाठवण्यात आले. तसेच आगामी काळात अटेना ग्रूप यांनी संघाकडून आणखी लोणी, दूध भुकटी व तूप खरेदी करण्यामध्ये स्वारस्य दाखवले असून त्यांना संघाचे दुग्ध पदार्थ निर्यात करण्यात येतील व भविष्यात इतर देशांना ही गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने निर्यात करण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे संघाचे चेअरमन अरुण डोंगळे सांगितले.

Gokul Dudh Sangh
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'कडून दूधवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन,१५ म्हशी आणि १५ गायींचे वाटप

पश्चिम आशियातील व पूर्व युरोपातील अझरबैजान देशातील बाकू या प्रदेशातील अटेना दूध संघ गोकुळकडून गाय तूप, लोणी आणि दूध भुकटी यांची आयात करून ते रशिया, अझरबैजान, कजाकिस्तान, इराण सह अशा वीस देशांमध्ये विक्री करणार आहेत. यामुळे गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आशिया व युरोपातील देशामध्ये उपलब्ध होणार असल्याची माहिती चेअरमन डोंगळे यांनी दिली.

यावेळी संघाचे चेअरमन अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी प्रदीप पाटील, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, प्रशासन व्यवस्थापक रामकृष्ण पाटील, मार्केटींग व्यवस्थापक हणमंत पाटील, उपेंद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्‍थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com