Millet Festival : कोल्हापुरातील तृणधान्य महोत्सवास चांगला प्रतिसाद

Millet Crop : विविध प्रकारच्या तृणधान्यासह आरोग्यदायी पदार्थांचा समावेश असलेल्या तृणधान्‍य महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Millet Festival
Millet FestivalAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : विविध प्रकारच्या तृणधान्यासह आरोग्यदायी पदार्थांचा समावेश असलेल्या तृणधान्‍य महोत्सवास चांगला प्रतिसाद मिळत आहे. जंगली, डोंगरी भागातील आदीवासींनी आरोग्यदायी सात्विक आहार संस्कृती जपली आहे.

यातील आदिवासी भागात पिकणारे साव, कोराळे, कोद्रा यासह नऊ प्रकारचे तांदूळ व तृण व भरड धान्यवर्गीय दुर्मिळ पदार्थ पणन महामंडळाच्या तृणधान्य महोत्सवात आहेत. विविध आजारांतील पथ्य काळात पर्याय म्हणून रुची वाढविणारे, आरोग्यदायी पदार्थ व कडधान्य पाहण्यासमवेत खरेदी करण्याची संधी मिळत आहे.

पणन महामंडळाच्या वतीने हा महोत्सव सुरू आहे. पणन महामंडळाचा तृणधान्य महोत्सव येथील टाकाळा रोडवरील व्ही. टी. पाटील सभागृहात होत आहे. यात कडधान्य, तृणधान्य, भरडधान्य विक्री व प्रदर्शन बुधवारपर्यंत (ता. ५) सुरू असणार आहे.

Millet Festival
Millet Festival : कोल्हापुरात भरणार मिलेट, फळ महोत्सवाची मेजवानी

अनेकांना तांदळाचा भात खाणे आवडत नाही किंवा आरोग्याच्या काळजीचा भाग म्हणून भात खाणे सोडले जाते. अशांना तांदळाच्या भाताला पर्याय म्हणून सावे, कोद्रा, कारोळापासून भात बनवला जातो. तशी इडली व बिस्‍किटेही बनवली जातात. यात पाककृतीनुसार कोणीही आवडीचे पदार्थ बनवतात.

Millet Festival
Millet Festival : मिलेट फेस्टिव्हलमध्ये १० सामंजस्य करार पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत खरेदीदार-विक्रेता संमेलन

त्यासाठी लागणारी सावे, कोदरा, कोराळा याचे पीठ किंवा रवा व त्यापासून बनवलेल्या पदार्थांची माहितीसह विक्री या महोत्सवात होते. मधूमेह, लठ्ठपणा, हृदय विकार, ब्लॉकेज कमी करण्यासाठी या सावे, कोराळ, कोदरा असे तृणधान्य गुणकारी मानले जाते.

त्यासाठी आयुर्वेद व तज्‍ज्ञांकडून आहाराविषयीचा सल्ला मिळतो. मात्र, असे धान्य मोजक्याच ठिकाणी मिळते. या धान्यासह स्ट्रॉबेरीसह विविध फळांची विक्रीही सुरू असल्याचे पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com