Sugar Production
Sugar ProductionAgrowon

Sugar Production : कोल्हापूर विभागात ८८ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

Kolhapur Sugar Production : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गाळपाची गती वाढली आहे. कोल्हापूर विभागात ३९ साखर कारखान्यांनी ८७ लाख ३० हजार ९५९ टन उसाचे गाळप करत ८८ लाख ६८ हजार ७४४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
Published on

ॲग्रोवन वृत्तसेवा

Sugarcane Crushing : सांगली ः सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गाळपाची गती वाढली आहे. कोल्हापूर विभागात ३९ साखर कारखान्यांनी ८७ लाख ३० हजार ९५९ टन उसाचे गाळप करत ८८ लाख ६८ हजार ७४४ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १०.१६ टक्के इतका आहे.

कोल्हापूर विभागात सांगली जिल्ह्यातील १० सहकारी, ६ खासगी व कोल्हापूर जिल्ह्याती १६ सहकारी, ७ खासगी अशा एकूण ३९ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे एकूण १ लाख ४० हजार, तर सांगली जिल्ह्यात १ लाख ३७ हजार हेक्टर उसाच्या नोंदी झाल्या आहेत. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू होऊन सुमारे सव्वा महिना झाला आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांकडून गाळपाला गती आली आहे.

Sugar Production
Sugar Production : मराठवाड्यासह खानदेशात ६४ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन

सांगली जिल्ह्यातील १६ साखर कारखान्यांनी ३४ लाख ४६ हजार ५३७ टन उसाचे गाळप केले आहे. साखरेचा उतारा ९.८७ टक्के इतका आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील २३ साखर कारखान्यांनी ५२ लाख ८४ हजार ४२२ टन उसाचे गाळप केले आहे. कोल्हापूर जिल्हा गाळपात आणि साखरेच्या उत्पादनात आघाडीवर आहे. तर साखरेचा उतारा १०.३४ टक्के इतका आहे.

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील साखर कारखान्यांनी पहिली उचल जाहीर केली आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातील एक-दोन साखर कारखान्यांनी पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केला आहे.

सांगली जिल्ह्यातील गाळप

सहकारी कारखाने १०

गाळप २४,०२,५०५ टन

साखर उत्पादन २४,६२,८२० क्विंटल

उतारा १०.२५ टक्के

सांगली जिल्ह्यातील गाळप

खासगी कारखाने ६

गाळप १०,४४,०३२ टन

साखर उत्पादन ९,३९,३४३ क्विंटल

उतारा ९ टक्के

कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप

सहकारी कारखाने १६

गाळप ३८,३०,५९४ टन

साखर उत्पादन ३९,९३,८१४ क्विंटल

उतारा १०.४३ टक्के

कोल्हापूर जिल्ह्यातील गाळप

खासगी कारखाने ७

गाळप १४,५३,८२८ टन

साखर उत्पादन १४,७२,७६७ क्विंटल

उतारा १०.१३ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com