Sugarcane FRP: ‘एफआरपी’ देण्यात कोल्‍हापूर विभागाची आघाडी, सोलापूर पिछाडीवर

FRP Payment: राज्यात उस उत्पादकांना एफआरपी देण्याच्या शर्यतीत कोल्हापूर विभाग पुन्हा एकदा आघाडीवर आहे. सोलापूर विभाग मात्र सर्वाधिक कारखाने असूनही एफआरपी देण्यात मागे पडल्याचे चित्र आहे.
Sugarcane FRP
Sugarcane FRPAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: राज्यात पूर्ण ‘एफआरपी’ देण्यात अनेक कारखाने पिछाडीवर पडत असले, तरी कोल्हापूर विभागातील साखर कारखान्यांनी मात्र एफआरपी देण्यात राज्यात आघाडी घेतली आहे.

संपूर्ण एफआरपी दिलेल्या एकूण १०५ कारखान्यांपैकी ३६ कारखाने कोल्हापूर विभागातील आहेत. यापैकी कोल्हापुरातील १९, तर सांगली जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी एफआरपी इतकी रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे. कोल्‍हापूर विभागाखालोखाल नांदेड विभागाने चांगली मजल मारली आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : एकरकमी एफआरपी निर्णयाचे नांदेडला स्वागत

नांदेडमध्ये २९ पैकी १६ कारखान्यांनी पूर्ण रक्कम दिली. या मध्ये लातूरमधील सर्वाधिक १०, परभणीतील ३, नांदेडमधील २, तर हिंगोलीतील एका कारखान्‍याचा समावेश आहे. पुणे विभागामध्ये ३१ पैकी पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील १० कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिली.

राज्यात सर्वाधिक कारखाने सोलापूर विभागात आहेत. या विभागातील ४५ पैकी केवळ १४ कारखान्यांनीच एफआरपी दिली आहे. यात सोलापुरातील दहा तर धाराशिव मधील ४ कारखान्यांचा समावेश आहे. अहिल्यानगर विभागातील २६ पैकी ९ कारखान्यांनी एफआरपीची रक्कम दिली. यामध्ये अहिल्यानगरमधील ८, तर नंदुरबार जिल्‍ह्यातील एका कारखान्याचा समावेश आहे.

Sugarcane FRP
Sugarcane FRP : उसाला एकरकमी एफआरपी

छत्रपती संभाजीनगरमधील २२ पैकी ८ कारखान्यांनी एफआरपी दिली. जालन्यातील एक तर बीडमधील ३ कारखान्यांनी शंभर टक्के एफआरपी दिली. अमरावती विभागातील ४ पैकी एका कारखान्‍याने एफआरपी दिली. यवतमाळमधील हा कारखाना आहे. नागपूरमध्ये एकाही कारखान्याने एफआरपीची रक्कम दिली नसल्याचे चित्र आहे.

कोल्हापूर विभागात एफआरपी ३१०० रुपयांच्‍या पुढेच

राज्यात कोल्हापूर विभाग हा साखरेच्या उत्‍पादनात आघाडीवर आहे. बारमाही पाण्यामुळे विभागातील कोल्‍हापूर व सांगली जिल्ह्यांतील ऊस पट्ट्यामध्ये उसाची चांगली वाढ दिसून येते. दोन्ही जिल्ह्यांतील बहुतांश कारखानदार राजकारणात सक्रिय असल्याने या विभागात एफआरपी वेळेत देऊन उस उत्पादकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न असतो. शेतकरी संघटनांचे प्राबल्‍य असल्याने दोन्ही जिल्ह्यांतील साखर कारखानदार एफआरपी देण्याला प्राधान्‍य देतात.

एफआरपी न देणाऱ्या कारखान्याला ऊसपुरवठा न करण्याची उत्पादकांनी मानसिकता असल्याने अनेक कारखानदार एफआरपी देतातच. काही कारखानदार एफआरपीपेक्षा थोडा अधिक दर देऊन उस उत्पादकांना आकर्षित करण्याचे प्रयत्न करतात. यंदा या विभागात प्रत्येक कारखान्याची एफआरपी ३१०० रुपयांच्‍या पुढे आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा प्रत्येक कारखान्याच्या साखर उत्‍पादनात घट असली तरी या कारखान्यांनी एफआरपी वेळेत दिली आहे. सोलापूरसारख्या ठिकाणी मात्र उतारा कमी असल्याने बहुतांश कारखान्यांना पूर्ण एफआरपी देणे जमले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com