Radhanagari Dam : जून निम्मा उलटला तरी पाऊस नाही, कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांची स्थिती अशी

Monsoon Rain : मॉन्सून पूर्व पावसाने चांगली साथ दिल्याने शेती पिकांना लागणारी आवर्तने वाचल्याने धरणांतील पाणीसाठी शिल्लक राहिला आहे.
Radhanagari Dam
Radhanagari Damagrowon
Published on
Updated on

Kolhapur Dams Water : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा मॉन्सूनपूर्व पावसाने चांगली साथ दिल्याने शेती पिकाला मोठा आधार मिळाला आहे. दरम्यान जिल्ह्यातील राधानगरी काळम्मावाडी व तुळशी धरण क्षेत्रात यंदा एक जूनपासून १७ जूनपर्यंत गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. शिवाय तीनही धरणांत गतवर्षीपेक्षा यंदा पाणीसाठाही अधिक शिल्लक आहे. मागच्यावर्षीपेक्षा पावसाचे प्रमाण अधिक असले तरी धरणात अजून पाण्याची आवक सुरू झालेली नाही. सद्यःस्थितीत तीन धरणांत एकूण ६.४३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

राधानगरी धरणक्षेत्रात यंदा १७७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी १५ जूनपर्यंत केवळ आठ मिलिमीटर पाऊस झाला होता. तुळशी धरण क्षेत्रात १३७, तर काळम्मावाडी धरणक्षेत्रात ११० मिलिमीटर पाऊस झाला आहे. गतवर्षी अनुक्रमे ३ आणि २५ मिलिमीटर इतकाच पाऊस झाला होता. यंदा या तीन धरणांत अद्याप ६.४३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.

गतवर्षी हा साठा ३.७९ टीएमसी होता. म्हणजेच तीनही धरणांत गतवर्षीपेक्षा जवळपास दुप्पट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या आठ दिवसात कमी-जास्त प्रमाणात पाऊस पडत असल्याने धरणांतील पाणी वापर कमी झाला आहे. त्यामुळे दमदार पाऊस सुरू होईपर्यंत तीनही धरणांत मुबलक पाणीसाठा शिल्लक राहील अशी सद्यःस्थिती आहे.

Radhanagari Dam
Kolhapur Sangli Flood : 'महापूर टाळण्यासाठी नियंत्रण समितीच नाही ही बाब खेदजनक' पूर परिषदेत नाराजी

शाहूवाडी तालुक्यातही पुरेसा पाणीसाठा

शाहूवाडी तालुक्यातील काही गावांना व पन्हाळा तालुक्याला सुजलाम् सुफलाम् करणाऱ्या कासारी (गेळवडे) या मध्यम प्रकल्पात १६ जून अखेर २९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, तो गतवर्षीच्या तुलनेने तो ११ टक्के अधिक आहे. उर्वरित पाच लघु पाटबंधारे प्रकल्पात सरासरी १० ते २२ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी कासारी नदीवरील सर्वच धरणातील पाणीसाठा गतवर्षीच्या तुलनेत समाधानकारक होता.

मॉन्सून पूर्व पावसाने चांगली साथ दिल्याने शेती पिकांना लागणारी आवर्तने वाचल्याने धरणांतील पाणीसाठी शिल्लक राहिला आहे. तसेच धरणांतील पाणी विसर्गाचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले असल्याची माहिती पन्हाळा पाटबंधारे विभागाचे शाखा अधिकारी सचिन लाड यांनी दिली आहे.

१७ जूनअखेर धरणांतील पाणीसाठा

राधानगरी ः २ टीएमसी (२३.९६ टक्के)

काळम्मावाडी ः ३.१६ टीएमसी (१२.४६ टक्के)

तुळशी ः १.२७ टीएमसी (३६.९२ टक्के)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com