
Chhatrapati Sambhajinagar : परिमंडलात आतापर्यंत ५६ हजार ९४० ग्राहकांकडे टीओडी मीटर बसवण्यात आले आहेत. यात नवीन वीजजोडणीच्या २१ हजार ९४४ मीटरचा समावेश असून, २७ हजार ८३६ ग्राहकांचे जुने मीटर बदलून त्या जागी टीओडी मीटर बसवले आहेत.
‘महावितरण’च्या माहितीनुसार, पीएम-सूर्यघर योजनेत छतावर सौर ऊर्जा संच आस्थापित केलेल्या ७ हजार १६० ग्राहकांनाही टीओडी मीटर बसविले आहेत. महावितरणतर्फे अत्याधुनिक असे टीओडी (टाइम ऑफ डे) मीटर वीजग्राहकांकडे बसवले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना आपल्या वीजवापराची माहिती दर तासानुसार (रिअल टाइम) उपलब्ध होणार आहे. ग्राहकांचे वीजवापरावर व पर्यायाने वीजबिलावर नियंत्रण राहणार असून, अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. हे मीटर पोस्टपेड असून मीटर रीडिंगनुसारच बिल देण्यात येणार आहे.
ग्राहकांवर कोणताही खर्चाचा बोजा न टाकता बसविण्यात येणारे हे मीटर त्यांच्या फायद्याचेच आहेत. छत्रपती परिमंडलात सध्या नवीन वीज जोडणी व सौर ऊर्जा ग्राहकांसाठी टीओडी मीटर बसवण्यात येत आहेत. तसेच जुने मीटर बदलून त्याजागीही टीओडी मीटर बसवले जात आहेत. टीओडी मीटरमध्ये कम्युनिकेशन पोर्ट असून ते महावितरणच्या सर्व्हरला जोडलेले असल्याने मीटरचा रिअल टाइम डाटा उपलब्ध होतो.
मीटर नादुरुस्त झाल्याची माहिती त्वरित मिळू शकेल. या मीटरचे रीडिंग ऑटोमॅटिक होणार आहे. यात मानवी हस्तक्षेपाला कोणताही वाव नाही. त्यामुळे ग्राहकांना अचूक व वेळेवर बिले मिळतील. हे अत्याधुनिक मीटर असल्याने प्रत्येक युनिटची रिअल टाइम माहिती ग्राहकास मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वीज वापरानुसार रीडिंग येते याची खात्री ग्राहकाला करता येणार आहे.
मीटरसाठी ग्राहकांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. ही केंद्र सरकारची योजना असल्याने मीटर बसविण्यासाठी केंद्राने निधी दिला आहे. टीओडी मीटरमुळे महावितरणची वाणिज्यिक हानी कमी होईल तसेच वीजचोरीवर नियंत्रण येणार आहे. त्यामुळे होणाऱ्या महसूल वाढीतून अधिकाधिक चांगली सेवा महावितरण देऊ शकेल. सध्या महावितरणने सर्व औद्योगिक ग्राहकांना टीओडी मीटर बसवलेले आहेत. त्यानुसार विशिष्ट कालावधीत वीज वापरासाठी महावितरणकडून औद्योगिक ग्राहकांना सवलत मिळते.
याच धर्तीवर टीओडी मीटर बसवलेल्या घरगुती ग्राहकांना विशिष्ट वेळी वीजवापर केला तर सवलत देण्याचे प्रस्ताव महावितरणने विद्युत नियामक आयोगाकडे सादर केलेला आहे. यात ग्राहकांचाच फायदा होईल. सध्या महावितरण, महापारेषणसह सर्व शासकीय कार्यालये व निवासस्थाने, मोबाइल टॉवर ग्राहकांकडे टीओडी मीटर बसविण्यात आले आहेत. या मीटरला ग्राहकांचा प्रतिसाद मिळत आहे.
अत्याधुनिक टीओडी मीटरमुळे ग्राहकांना आपल्या वीजवापराची रिअल टाइम माहिती उपलब्ध होणार आहे. तसेच ऑटोमॅटिक रीडिंगमुळे अचूक व वेळेत बिल मिळणार आहे. ग्राहकांनी कोणताही गैरसमज न बाळगता टीओडी मीटर बसविण्यासाठी सहकार्य करावे.
- पवनकुमार कछोट, मुख्य अभियंता, महावितरण, छत्रपती संभाजीनगर परिमंडल
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.