पावसाने अजूनही सर्वत्र हजेरी लावलेली नाही त्यामुळे खरीपातील पेरण्याही अपेक्षित प्रमाणात पार पडलेल्या नाहीत. यंदाच्या तेलबिया (Oil seeds) लागवड क्षेत्रातही २०.३ टक्क्यांची घट दिसून आली. आजवरच्या सरकारी आकडेवारीनुसार ७७.८० लाख हेक्टरवर तेलबियांची (Oil seeds) लागवड करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत ९७.५६ लाख हेक्टरवर तेलबियांचा पेरा झाला होता. तेलबियांपैकी सोयबीनचा (Soybean) पेराही यंदा २२ टक्क्यांनी घटला. ५४.४३ लाख हेक्टर क्षेत्रात सोयाबीन लागवड झाल्याची नोंद आहे.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माहितीनुसार मागील वर्षाच्या तुलनेत या जुलैच्या पहिल्या आठवड्यात एकूण खरीप पिकांच्या (Kharif Crops) क्षेत्रात १७ टक्क्यांची घट दिसून आली. असे असले तरी जुलैच्या उर्वरित ३ आठवड्यांत सरासरीएवढा पाऊस पडेल आणि खरीपातील पेरण्यांना वेग येईल, अशी अपेक्षा जाणकारांनी व्यक्त केली.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या शुक्रवारी प्रसारित केलेल्या साप्ताहिक आकडेवारीनुसार, २ जुलै ते ८ जुलै दरम्यान देशभरात १२७.९४ लाख हेक्टरवर खरीपाची लागवड (Kharif sowing) करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत हे प्रमाण १५३.८१ लाख हेक्टर होते.
यावर्षी खरिपात भात लागवडीत घट झाल्याचे दिसून आले. ८ जुलैपर्यंत देशभरात केवळ ७२.२४ लाख हेक्टर क्षेत्रात भातलागवड (Paddy Cultivation) करण्यात आल्याची नोंद आहे. गेल्यावर्षी याच कालावधीत ९५ लाख हेक्टरवर भातलागवड करण्यात आली होती. उत्तर प्रदेशचा अपवाद वगळता इतर प्रमुख तांदूळ उत्पादक राज्यांत यंदा भातलागवडीचे क्षेत्र घटले आहे.
या खरिपात २५ जून ते १ जुलै दरम्यान १३८.२ लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या (Kharif sowing) झाल्या होत्या. एकूण खरीप लागवडीचा आकडा ४०६.६६ लाख हेक्टरवर गेला होता. गेल्यावर्षी याच कालावधीत हा आकडा ४४८.२३ लाख हेक्टर असा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत शुक्रवारपर्यंत झालेल्या खरीप लागवडीत ९.३ टक्क्यांची घट नोंदवण्यात आली.
या खरिपात ४६.५५ लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्याची (Pulses)लागवड करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत ४६.१० लाख हेक्टर क्षेत्रात कडधान्य लागवड करण्यात आली होती. या खरिपात भुईमूग (Groundnut) लागवड क्षेत्रात १९ टक्क्यांची घट होऊन भुईमूग लागवडीखालील क्षेत्र २०५१ लाख हेक्टरपुरते सीमित झाले. मका लागवडीचे क्षेत्र (३१.८६ लाख हेक्टर) २३. ५ टक्क्यांनी घटले.
तृणधान्य (Cereals) लागवडीचे क्षेत्र मागच्या वर्षीच्या ६४.३६ लाख हेक्टरवरून ६५.३१ लाख हेक्टरवर आले. मका लागवड क्षेत्रात २३.५ टक्क्यांनी घटून ३१.८४ लाखांवर आले. शुक्रवारपर्यंत ८४.६ लाख हेक्टर क्षेत्रात कापसाचा (Cotton) पेरा झाला.
मागच्यावर्षी याच कालावधीत ८४.७५ लाख हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली होती. ताग (Jute) लागवडीत गेल्यावर्षीच्या (६.९१ लाख हेक्टर क्षेत्र) तुलनेत किंचित (६.८६ लाख हेक्टर) घट झाली. या खरिपात शुक्रवारपर्यंत ५३३१ लाख हेक्टरवर उसाची लागवड (Sugarcane) करण्यात आली. गेल्यावर्षी याच कालावधीत ६.९१ लाख हेक्टरवर उसाचा पेरा करण्यात आला होता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.