Kharif Sowing : देशात खरीप पेरणी क्षेत्रात २४ लाख हेक्टरने वाढ

Kharif Season : या वर्षीचे खरीप हंगामातील एकूण पेरणी क्षेत्र ७०४ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे.
Kharif Sowing
Kharif SowingAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : या वर्षीचे खरीप हंगामातील एकूण पेरणी क्षेत्र ७०४ लाख हेक्टरच्या पुढे गेले आहे. गेल्या हंगामात नोंदविलेल्या ६८०.३६ लाख हेक्टरच्या तुलनेत २४ लाख हेक्टरने हे क्षेत्र वाढले आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

या हंगामात भात पिकाचे सर्वाधिक पेरणी क्षेत्र १६६.०६ लाख हेक्टरवर पोहोचले आहे. गेल्या वर्षी हे क्षेत्र १५५.६५ लाख हेक्टर होते. कडधान्य पिकांच्या पेरणी क्षेत्रातही उल्लेखनीय वाढ झाली आहे. यावर्षी ८५.७९ लाख हेक्टरवर कडधान्यांची पेरणी झाली आहे.

Kharif Sowing
Kharif Sowing : शिरोळ तालुक्यात ६२ टक्के पेरण्या

मागील हंगामात ती ७०.१४ लाख हेक्टर होती. विशेषतः तूर या प्रमुख कडधान्य पिकाच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या १९.३४ लाख हेक्टरवरून तुरीचे क्षेत्र ३३.४८ लाख हेक्टरपर्यंत पोहचले आहे. आयात कमी करण्यासह देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी ही वाढ महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे.

Kharif Sowing
Kharif Season : पावसाअभावी हंगामाच्या सुरुवातीलाच चिंता

जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, तेलबियांच्या पेरणी क्षेत्रातही वाढ झाली आहे. तेलबिया लागवडीखालील एकूण क्षेत्र १६३.११ लाख हेक्टरपर्यंत वाढले आहे. गेल्या हंगामात हे क्षेत्र १५०.९१ लाख हेक्टर होते. भुईमूग क्षेत्र वाढले आहे. सोयाबीन लागवडीत मात्र घट झाली आहे.

ऊस क्षेत्र स्थिर

उसाचे क्षेत्र तुलनेने स्थिर राहिले आहे. या हंगामात ५७.६८ लाख हेक्टरवर उसाची लागवड झाली आहे. कापूस क्षेत्रात घट झाली आहे. कापूस लागवडीखालील निव्वळ क्षेत्र गतवर्षीच्या १०५.६६ लाख हेक्टरवरून १०२.०५ लाख हेक्टरवर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com