Kharif Production : देशात खरीप उत्पादन विक्रमी

Union Ministry of Agriculture : देशात खरीप हंगामामधील पिकांचे उत्पादन विक्रमी होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी (ता. ५) पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला आहे.
Kharif Crops
Kharif CropsAgrowon
Published on
Updated on

New Delhi News : देशात खरीप हंगामामधील पिकांचे उत्पादन विक्रमी होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने मंगळवारी (ता. ५) पहिला आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये अन्नधान्याचे उत्पादन १,६४७.०५ लाख टन होण्याचा अंदाज आहे. जो मागील वर्षीच्या तुलनेत ८९.३७ लाख टनाने अधिक आहे. खरीप अन्नधान्य उत्पादन सरासरीपेक्षा १२४.५९ लाख टन जास्त आहे.

हा अंदाज प्रामुख्याने राज्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर तयार वर्तविण्यात आला आहे. तांदूळ, ज्वारी आणि मक्याच्या चांगल्या उत्पादनामुळे अन्नधान्य उत्पादनात विक्रमी वाढ होण्याची अपेक्षा आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

Kharif Crops
Kharif Crop Damage : परतीच्या पावसाने राज्यातील ३० हजार हेक्टरवरील पिके नष्ट

खरीप तांदळाचे एकूण उत्पादन २०२४-२५ मध्ये ११९९.३४ लाख टन असण्याचा अंदाज आहे. जो मागील वर्षीच्या तुलनेत ६६.७५ लाख टनाने जास्त आहे. तसेच सरासरी खरीप भात उत्पादनापेक्षा ११४.८३ लाख टनाने जास्त आहे.

खरीप मका पिकाचे उत्पादन २४५.४१ लाख टन आणि भरडधान्याचे उत्पादन ३७८.१८ लाख टन असण्याचा अंदाज आहे. तसेच २०२४-२५ मध्ये एकूण खरीप कडधान्य उत्पादन ६९.५४ लाख टन असण्याचा अंदाज आहे.

Kharif Crops
Kharif Season Loss : पावसाने खरीप हंगाम गेला; बळिराजा ‘रब्बी’च्या लागला तयारीला

एकूण खरीप तेलबियांचे उत्पादन २५७.४५ लाख टन असण्याचा अंदाज आहे जो मागील वर्षीच्या खरीप तेलबियांच्या एकूण उत्पादनापेक्षा १५.८३ लाख टनाने जास्त आहे. खरीप भुईमूग उत्पादन अंदाजे १०३.६० लाख टन आणि सोयाबीन उत्पादन १३३.६० लाख टन अंदाजित आहे.

मॉन्सूनच्या पावसाने शेतकऱ्यांना या खरीप हंगामात अधिक पिके पेरण्यास मदत केली आहे. लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा मुख्य स्त्रोत असलेल्या एकूण कृषी क्षेत्रासाठी हे चांगले आहे. भारतातील नैॡत्य मोसमी पावसाने या मोसमात चार वर्षांचा उच्चांक गाठला आहे. दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या सुमारे १०८ टक्के ९३४.८ मिलिमीटर इतका पाऊस पडला, असे राज्य-संचालित हवामान विभाग भारतीय हवामान खात्याने उपलब्ध केलेल्या आकडेवारीवरून दिसून आले आहे.

८६८.६ मिलिमीटर पाऊस हा भारतातील दीर्घ कालावधीची सरासरी आहे. भारतातील खरीप पिकांची पेरणी या हंगामात जोरदार झाली असून, शेतकऱ्यांनी सुमारे १,११० लाख हेक्टरवर पिकांची लागवड केली आहे, असेही कृषी मंत्रालयाने अंदाजात म्हटले आहे.

खरीप हंगाम २०२४-२५ मध्ये अंदाजे उत्पादन (लाख टनांमध्ये)

अन्नधान्य उत्पादन ---- १,६४७.०५

तांदूळ ---- ११९९.३४

खरीप मका ---- २४५.४१

भरडधान्य ----३७८.१८

कडधान्य----६९.५४

तेलबिया ---- २५७.४५

भुईमूग ----१०३.६०

सोयाबीन ----१३३.६०

अन्नधान्य उत्पादन ---- १,६४७.०५

तांदूळ ---- ११९९.३४

खरीप मका ---- २४५.४१

भरडधान्य ----३७८.१८

कडधान्य----६९.५४

तेलबिया ---- २५७.४५

भुईमूग ----१०३.६०

सोयाबीन ----१३३.६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com