Crop Loan Target : अमरावतीत पीककर्जाचा २१०० कोटींचा प्रस्तावित लक्ष्यांक

Agriculture Loan : खरीप आणि रब्बी हंगाम २०२५ करिता पीककर्जाचे लक्ष्यांक २१०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Amaravati News : खरीप आणि रब्बी हंगाम २०२५ करिता पीककर्जाचे लक्ष्यांक २१०० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. तर पीककर्जाचा लक्ष्यांक गतवर्षी इतकाच प्रस्तावित करताना पीकनिहाय कर्जाची मर्यादा मात्र वाढीव प्रस्तावित करण्यात आली आहे. या प्रस्तावास अद्याप राज्यस्तरीय बॅंकिंग समितीची मंजुरी मिळायची असून, ती येत्या पंधरवड्यात मिळण्याची शक्यता असल्याचे अग्रणी बॅंकेचे व्यवस्थापक श्यामकुमार शर्मा यांनी सांगितले.

पुढील हंगामाची तयारी सुरू झाली असून, पीककर्ज वितरणासाठी जिल्हास्तरीय बॅंकिंग समितीची बैठक जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत नुकतीच पार पडली. या बैठकीत २०२५-२६ च्या खरीप व रब्बी हंगामासाठी कर्जाचे लक्ष्यांक प्रस्तावित करण्यात आले आहे. Crop Loan

Crop Loan
Crop Loan Target : पीककर्जाचे २४०० कोटींचे उद्दिष्ट

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेसह राष्ट्रीय, सार्वजनिक व ग्रामीण बॅंक मिळून २१०० कोटी रुपयांचे पीककर्ज वितरणाचे लक्ष्यांक प्रस्तावित करण्यात आले आहे. गतवर्षीही २१०० कोटींचेच लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले होते.

मात्र वितरण १६११.६४ कोटी रुपयांचे झाले. गतवर्षीच्या दोन्ही हंगामात दोन लाख ७७ हजार १०० शेतकऱ्यांसाठी लक्ष्यांक निश्‍चित करण्यात आले असताना १ लाख १९ हजार ६३६ शेतकऱ्यांना कर्जपुरवठा झाला. कर्ज वितरणाचे प्रमाण ७७ टक्के होते.

Crop Loan
Crop Loan Waiver : पीक कर्जमाफीवरून विरोधक आक्रमक; केंद्राकडून विशेष पॅकेज आणून पेरणीपूर्वी कर्जमाफीची मागणी

गतवर्षी निश्‍चित करण्यात आलेल्या लक्ष्यांकाचे उद्दिष्ट पूर्ण करता आलेले नाही. त्याचप्रमाणे या हंगामातील शेतीमालाची उत्पादकता व मिळालेला भाव बघता पीककर्जाचे उद्दिष्ट गतवर्षी इतकेच ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. प्रस्तावित करण्यात आलेले लक्ष्यांक राज्यस्तरीय बॅंकिंग समितीच्या बैठकीत अंतिम करण्यात येणार असून त्यामध्ये वाढ किंवा कमी होण्याची शक्यता आहे.

पीकनिहाय प्रति हेक्टर किमान प्रस्तावित पीककर्ज (गतवर्षीचे दर)

कपाशी (जिरायती) ः ६९,८०० (६३,५२५), कपाशी (बागायती) ः ९१,४०० (८३,१६०), संकरित ज्वारी ः ३५,१०० (३१,९७०) , तूर ः ४७,९०० (४३,५६०), सोयाबीन ः ६७,३०० (६१,२१५), मूग ः २७,९०० (२५,४१०), उडीद ः २७,९०० (२५,४१०), गहू (बागायती) ः५०,८०० (४६,२००), हरभरा (जिरायती) ः ४८,२०० (४३,८९०), हरभरा (बागायती) ः ५०,८०० (४८,५१०), धान ः ५८,५०० (५३,२४०).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com