
Akola News : परंपरागत शेतीच्या पलीकडे जाऊन भाजीपाला व फळबाग लागवडीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांना आता खरीप हंगामातही अधिक उत्पादन व उत्पन्न मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
खरीप काकडीच्या उत्पादनातूनही वर्षभर उत्पन्न मिळवणे शक्य असून, त्यासाठी वैज्ञानिक व नियोजनबद्ध पद्धतीने लागवड करणे आवश्यक असल्याचे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या मिरची व भाजीपाला संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ व पैदासकार डॉ. श्याम घावडे यांनी व्यक्त केले.
अकोला तालुक्यातील मौजे वाळकी येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) आणि कृषी विभागाच्या वतीने खरीप काकडी पिकावरील शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रगतिशील शेतकरी संतोष कातखेडे यांच्या शेतावर आयोजित या कार्यक्रमात प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, प्रकल्प उपसंचालक डॉ. प्रेमसिंग मारग, प्रभारी तालुका कृषी अधिकारी सुधाकर खंडारे यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम झाला. आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही.एम. शेगोकार यांनी आयोजन केले होते.
या शेतीशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. घावडे म्हणाले, की खरिपात म्हणजेच जून-जुलै महिन्यांत काकडीची लागवड केल्यास उत्तम उत्पादन मिळते. त्यासाठी सुधारित जातींची निवड, योग्य खत व्यवस्थापन, पाणी नियोजन, कीड व रोग नियंत्रण अशा बाबींवर भर दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होऊ शकते.
कार्यक्रमाला सरपंच संदेश सदाशिव, उपसरपंच राहुल कातखेडे, सहायक तंत्र व्यवस्थापक अर्चना पेटे, उपकृषी अधिकारी विजय महाजन, सहायक कृषी अधिकारी कैलास बोदडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शेगोकार यांनी केले. शेतीशाळेत उपस्थित शेतकऱ्यांच्या शंका समाधान सत्रात डॉ. घावडे यांनी सविस्तर उत्तर देत शेतकऱ्यांचे समाधान केले. या यशस्वी कार्यक्रमासाठी नितीन गावंडे, कृषी सखी राधिका गावंडे, कोमल कातखेडे, विद्या कातखेडे, चक्रनारायण यांचा मोलाचा सहभाग राहिला. शेतीशाळेत काकडी उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.