Heavy Rain : पावसाच्या संततधारेने जिल्ह्यात खरीप पिकांना फटका

Kharif Crop Damage : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाच्या संततधारेने खरिपातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांना फटका बसला.
Heavy Rain
Heavy Rain Agrowon
Published on
Updated on

Solapur News : सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी (ता. २६) पावसाने काहीशी विश्रांती घेतली, पण दिवसभर ढगाळ वातावरण मात्र कायम राहिले. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाच्या संततधारेने खरिपातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग या पिकांना फटका बसला असून, सततच्या पावसामुळे किडरोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांच्या तळात पाणी साठून राहिल्याने ही पिके पिवळी पडली आहेत.

गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यात पावसाची थांबून-थांबून संततधार सुरू आहे. गेल्या दोन दिवसांत तर त्याचा जोर अधिक राहिला. जिल्ह्यातील पंढरपूर, करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस असा सर्वदूर पाऊस पडतो आहे. गेल्या तीन-चार दिवसांत सूर्यदर्शनही झालेले नाही. शुक्रवारी (ता. २६) मात्र पावसाने विश्रांती घेतल्याचे चित्र होते.

Heavy Rain
Crop Damage : राज्यात ६८ हजार हेक्टर पिके नष्ट; पंचनामे सुरू

तसेच दिवसभर कधी ढगाळ, कधी ऊन असे वातावरण राहिले. यंदा जिल्ह्यात कधी नव्हे ती खरिपाची सर्वाधिक ४ लाख ९३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. जुलै महिन्यात पाच-सहा दिवस सोडले, तर सतत पाऊस पडतो आहे. जुलै महिन्याची पावसाची सरासरी ९४.८ मिलिमीटर आहे. पण प्रत्यक्षात या महिन्यात आतापर्यंत १०१.५ मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.

Heavy Rain
Heavy Rain : अतिवृष्टीचा चुकून गेलेला २२ लाखांचा निधी वसूल

जिल्ह्यातील खरिपाच्या एकूण पेरणीत यंदा १ लाख ३२ हजार ४४० हेक्टरवर सर्वाधिक सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यानंतर १ लाख ३५ हजार हेक्टरवर उडीद, ९६ हजार हेक्टरवर तूर, ८४ हजार हेक्टरवर मका आणि २४ हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी झाली आहे. पण सततच्या पावसामुळे या पिकांमध्ये कीड-रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे.

तसेच पिकाच्या तळात पाणी साठून राहिल्याने सोयाबीन, उडीद ही पिके पिवळी पडू लागली आहेत. नव्याने झालेल्या कांदा लागवड आणि कांद्याची रोपेही पावसाच्या पाण्यामुळे सडून गेली आहेत. त्यामुळे एकीकडे पावसाने चांगला दिलासा मिळाला असताना, आता नुकसानही सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com