

Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ७ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे. गेल्या वर्षी ७० हजार ५४४ क्विंटल बियाण्यांची विक्री झाली होती. त्यानुसार यंदा मागील तीन वर्षाच्या बियाणे विक्रीची सरासरी काढून यंदा ७७ हजार ३०५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ६२ हजार ०२१ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. गेल्या वर्षी ७ लाख २३ हजार ११२ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा गतवर्षीपेक्षा वीस हजार हेक्टरवर अधिक पेरणी होण्याचा अंदाज धरून क्षेत्र खरिपासाठी क्षेत्र प्रस्तावित केले आहे. खरिपातील प्रमुख पीक असलेल्या बाजरीचे क्षेत्र वरचेवर कमी होत आहे.
खरिपासाठी मागील तीन वर्षांत झालेल्या बियाणे विक्रीच्या सरासरीनुसार खरिपासाठी बियाणे मागणी केली जाते. २०२२ मध्ये ४९ हजार ७५५ क्विंटल, २०२३ साठी ५९ हजार ३२० क्विंटल आणि २०२४ मध्ये ७० हजार ५४४ क्विंटल बियाणे विक्री झाली होती. गतवर्षी ७ लाख २३ हजार ११२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली होती. यंदा ७ लाख ४२ हजार हेक्टर क्षेत्र प्रस्तावित केले आहे.
गतवर्षीच्या बियाणे बदलाच्या प्रमाणानुसार यंदा ७७ हजार ३०५ क्विंटल बियाण्यांची मागणी केली आहे. त्यात ३७ हजार ६१७ क्विंटल सार्वजनिक, ३९ हजार ६८८ क्विंटल खासगी बियाण्यांची मागणी केली आहे. त्यातील बहुतांश बियाण्यांचा पुरवठा झाला आहे. कापसाच्या बियाण्यांची विक्री सुरू झाली आहे. यंदा पाऊस लवकर सुरू होण्याचा अंदाज आहे. असे झाले तर मूग, उडीद आणि तुरीचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज आहे.
बियाणे मागणी (क्विंटल)
कंसात पेरणीक्षेत्राचा अंदाज (हेक्टर)
भात ६,८४८ (२१,०००)
बाजरी ३,१५० (८५,०००)
मका १४,४०० (९१,०००)
तूर ५,९२९ (७७,०००)
मूग १,६८३ (५१,०००)
उडीद ३,९९० (७१,०००)
सोयाबीन ३९,३७५ (१,९०,०००)
कापूस २,७३० (१,५६,०००)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.