Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Wheat Sowing : खानदेशात गेल्या रब्बी हंगामात कृषी विभाग व विविध शेतऱ्यांच्या प्रोत्साहनाने खपली गव्हाची पेरणी बऱ्यापैकी झाली. परंतु खपली गहू मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणेचा अभाव खानदेशात आहे.
Wheat Sowing
Wheat SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात गेल्या रब्बी हंगामात कृषी विभाग व विविध शेतऱ्यांच्या प्रोत्साहनाने खपली गव्हाची पेरणी बऱ्यापैकी झाली. परंतु खपली गहू मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणेचा अभाव खानदेशात आहे. यामुळे अनेक शेतकरी हा गहू लागवड, उत्पादन करणे बंद करीत आहेत. या गव्हासंबंधी कृषी विभागाने तांत्रिक मार्गदर्शन व यंत्रणा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

खपली गहू मळणीअभावी गव्हाचा उपयोगच होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे मळणीसाठी तंत्रशुद्ध यंत्रणा, आवश्यक सामग्री उपलब्ध करून देण्याची मागणी लाभार्थी शेतकरी करीत आहेत. खपली गहू पेरणी वाढून शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी कृषी विभागाने जळगाव जिल्ह्यात सुमारे ७५ एकरात बीजोत्पादन कार्यक्रम दोन वर्षांपूर्वी हाती घेतला होता.

Wheat Sowing
Rabi Sowing : सांगोला तालुक्यात ५७ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन

पण पुढे त्यावर काम झाले नाही. जिल्ह्यात खपली गव्हाखालील क्षेत्र आणखी वाढावे, असा उद्देश यामागे होता. पण मागील हंगामात कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रांनी यासंबंधी कार्यक्रम राबविणे टाळले. अनेक शेतकऱ्यांनी बाजारातून खपली गहू बियाणे खरेदी करून त्याची एक ते दोन एकरात पेरणी केली होती. धुळ्यातही पेरणी झाली होती. पण मळणीसाठी जळगाव, धुळ्यात यंत्रणा नाही.

अनेक शेतकरी घरी वापरासाठी गहू तयार करू शकले नाहीत. मळणीसाठी प्रचलित गहू मळणीची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गहू मळणीचे हार्वेस्टर, ट्रॅक्टरचलित यंत्रणा, बैलजोडीने ओढले जाणारे थ्रेशरमध्येदेखील या गव्हाची मळणी होत नाही. काही शेतकऱ्यांनी मळणी करून घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नाही. शेतकऱ्यांचा मळणीवरील खर्च वाया जात होता.

मळणीसाठी राईस मिलच्या धर्तीवरची यंत्रणा विविध गावांमध्ये स्थापन करण्याची गरज आहे. मळणी व स्वच्छता व्यवस्थित न झाल्याने या गव्हाची विक्री शेतकरी करू शकत नाहीत. कारण खरेदीदारांना व्यवस्थित सच्छ केलेला गहू हवा आहे.

Wheat Sowing
Sangli Rabi Sowing : सांगलीत रब्बी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता

आरोग्याबाबत जनजागृती होत असून, खपली गव्हास मागणी आहे, पण त्याचा लाभ शेतकरी घेऊ शकत नसल्याची स्थिती आहे. खपली गव्हाचे क्षेत्र पुढे वाढवायला हवे. काही शेतकऱ्यांनी पुणे, सांगली जिल्ह्यातून बियाणे आणलॆ आहे. शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यायचा असेल तर शहरे, मोठी गावे किंवा पेरणी झालेल्या क्षेत्रानजीक मळणीसाठी राईस मिलच्या धर्तीवर यंत्रणा उभी करण्याची गरज आहे, अशी मागणी केली जात आहे

काही शेतकरी अग्रेसर

खपली गव्हाबाबत रावेर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी चांगले काम केले आहे. या गव्हाचे वाण संवर्धन, प्रसार यासाठीही शेतकरी काम करीत आहेत. काही शेतकरी दरवर्षी पेरणी करून त्यापासून विविध उपपदार्थनिर्मिती व किरकोळ विक्रीही करतात. परंतु या कार्यास कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग यांच्याकडून ठोस मदत, प्रोत्साहन मिळाल्यास त्याची व्याप्ती वाढून अनेक शेतकऱ्यांना लाभ होईल, असेही शेतकऱ्याांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com